Soybean Bajarbhav : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन बाजारभावात वाढ होत असल्याने देशांतर्गत सोयाबीन दरात सुधारणा होत आहे. काल सोयाबीनला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या महिन्याभरातील सर्वोच्च बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो काल सोलापूर एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला होता.

दरम्यान आज राज्यातील उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला सर्वाधिक कमाल बाजारभाव मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला 5852 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया 6 नोव्हेंबर रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :– सोयाबीन लिलावासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सहा हजार 100 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5800 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5852 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५८२६ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.

पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- मराठवाड्यातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ अर्थातच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 35 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5166 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5276 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,241 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 257 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5095 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5521 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5250 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.