file photo

Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे राज्यात सोयाबीन या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते.

अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारभावाकडे लक्ष लागून असते. आपण देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेणार आहोत.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- जळगाव एपीएमसीमध्ये आज 289 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला 4600 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- सेलू एपीएमसी मध्ये आज 439 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनला 3971 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 471 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसी मध्ये आज 1,250 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव देशील पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील तेवढाच राहिला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 27 हजार 774 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज 4250 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4765 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4507 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2533 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 204 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. सर्वसाधारण बाजार भाव 4966 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसी मध्ये आज 2500 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5290 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4845 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 4364 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीन ला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5135 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4600 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 797 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 3700 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4824 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.