Soybean Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढली आणि सोयाबीन दराला आधार मिळाला. सोयाबीनला राज्यातील बहुतांशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 6000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक कमाल बाजार भाव मिळू लागलेत.

सरासरी बाजार भावात देखील मोठी वाढ झाली आणि सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक मिळू लागला. दरम्यान आता त्यामध्ये थोडीशी घसरण झाली आहे.

मात्र सोयाबीन दरात येत्या काही दिवसात अजून वाढ होणार असल्याची आशा शेतकऱ्यांना असल्याने शेतकरी बांधवांनी आता सोयाबीन विक्री ऐवजी साठवणुकीवर भर दिला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील सोयाबीन दर 14 नोव्हेंबर पासून स्थिरावले असून माजलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनला सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमीच मिळत आहे. यामुळे माजलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनची आवक मंदावली आहे. शेतकऱ्यांच्या मते सोयाबीनला येत्या काही दिवसात दर वाढण्याची शक्यता आहे.

यामुळे त्यांनी सोयाबीन विक्री ऐवजी साठवणुकीवर भर दिला आहे. माजलगाव एपीएमसी मध्ये 14 नोव्हेंबर रोजी सोयाबीनचे 3504 क्विंटल आवक झाली होती. त्यादिवशी या बाजारामध्ये सोयाबीनला 4300 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला, 5825 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला होता.

तसेच सरासरी बाजार भाव 4300 नमूद करण्यात आला होता. दरम्यान 14 नोव्हेंबर पासून माजलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनचा कमाल बाजार भाव 6000 रुपयाच्या आतच आहे आणि सरासरी बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल पेक्षा कमी आहे. 14 नोव्हेंबर पूर्वी माजलगाव एपीएमसीमध्ये सोयाबीनचा कमाल बाजार भाव 6000 रुपयांपेक्षा अधिक झाला होता.

तसेच सरासरी बाजार भावाने देखील साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलचा पल्ला गाठला होता. मात्र आता सोयाबीन दर स्थिरावले असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. काल झालेल्या लिलावात माजलगाव एपीएमसी मध्ये 1604 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती.

काल झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला होता तसेच कमाल बाजारभाव 5,650 रुपये आणि सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला होता.

निश्चितच कमाल बाजार भाव 14 नोव्हेंबर च्या तुलनेत घसरले असले तरी देखील सरासरी आणि किमान बाजार भाव वाढले आहेत. मात्र शेतकरी बांधवांनी आवक देखील मोठी कमी केली आहे. शेतकऱ्यांना दरवाढीची आशा असल्याने सोयाबीनची आवक कमी होत असल्याचे व्यापाऱ्यांनी नमूद केले आहे.