Soybean Bajarbhav : गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामाच्या तुलनेत यंदाच्या हंगामात सोयाबीनला कमी दर मिळत आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच सोयाबीन दर दबावात आहेत. दरम्यान गेल्या दोन आठवड्यांपूर्वी केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेल बियांवर असलेले स्टॉक लिमिट काढून घेतले यामुळे सोयाबीन दरात थोडी सुधारणा झाली.

मात्र अद्यापही सोयाबीनला मिळत असलेले दर गेल्या वर्षीच्या तुलनेत कमीच आहेत. आज वासिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर मिळाला आहे.

यामुळे पुन्हा एकदा सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा बळावू पाहत आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या दराविषयी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1370 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5568 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 21 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5100 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5400 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5250 रुपये नमूद करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4407 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5575 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5537 रुपये नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :– कारंजा एपीएमसी मध्ये आज 4500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4850 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5550 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३५० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 43 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 800 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5100 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5351 रुपये नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 169 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5562 रुपये प्रतिक गुंतले एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5470 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज पंधराशे क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5190 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5620 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5405 रुपये नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 17 हजार 395 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5500 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार 204 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5700 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसी मध्ये आज 6498 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज ५६९१ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5995 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5000 रुपये नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 956 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5645 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५४२२ रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती :- परभणी एपीएमसीमध्ये आज 1192 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 670 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 11000 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 6200 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आलेला आहे.