Soybean Bajarbhav : नुकत्याच चार-पाच दिवसांपूर्वी केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतले आहे. केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे तेलबियाच्या दरात वाढ होणार असल्याचा अंदाज काही जाणकार लोकांनी व्यक्त केला होता.

या निर्णयामुळे सोयाबीन बाजार भाव देखील मोठी वाढ होईल असे जाणकारांनी नमूद केले होते. विशेष म्हणजे या निर्णयानंतर सोयाबीन बाजारभावात थोडी वाढ पाहायला मिळाली. सोयाबीनच्या बाजारभावात केंद्रशासनाच्या या निर्णयानंतर 300 ते 400 रुपयांची वाढ झाली होती.

मात्र आज झालेल्या लिलावात सोयाबीन बाजार भावात तब्बल 1000 रुपयांची घसरण झाली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की कालपर्यंत सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळत होता. मात्र आज अचानक सोयाबीन बाजारभावात एक हजार रुपयांचे घसरण नमूद करण्यात आली आहे.

मित्रांनो आज झालेल्या लिलावात शेवगाव भोदेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मात्र 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. म्हणजे सोयाबीन बाजारभावात एक हजार रुपयांची मोठी घसरण झाली आहे. निश्चितच यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या चिंतेत भर पडणार आहे. दरम्यान आज झालेल्या लिलावात इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळाला आहे.

म्हणजे आज फक्त  शेवगाव भोदेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्यच सोयाबीन दरात घसरण पाहायला मिळाली आहे. मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची चर्चा करणार आहोत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोलापूर एपीएमसीमध्ये आज 657 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5760 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– विदर्भातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून ओळखली जाणारी नागपूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 4569 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला ४५५० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5752 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5452 प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– लातूर एपीएमसी मध्ये आज 16732 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 6 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5900 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 7633 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5600 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 247 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4705 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5654 प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5180 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

शेवगाव भोदेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला सर्वात कमी बाजार भाव मिळाला आहे. आज झालेल्या लिलावत या एपीएमसी मध्ये पाच क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील तेवढाच राहिला आहे.

परतुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- परतुर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 248 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5220 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5720 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5620 रुपये नमूद करण्यात आला आहे.

सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 500 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावती एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5000 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.