Soybean Bajarbhav : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. खरं पाहता गेल्या चार ते पाच दिवसांपासून सोयाबीन दरात वाढ होऊ लागली आहे. केंद्र शासनाने सोयाबीनवरील स्टॉक लिमिट काढल्यानंतर सोयाबीन दरात वाढ होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

जाणकार लोकांच्या मते, केंद्र शासनाने तेलबिया आणि खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढल्यानंतर उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची साठवणूक केली जात आहे. यामुळे सोयाबीन दरात वाढ होत आहे.

दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसी मध्ये आज 2714 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5650 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये प्रतिक्विंटल करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- उदगीर एपीएमसी मध्ये आज 6700 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5650 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5761 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5705 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसी मध्ये आज 8000 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5210 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5675 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5450 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये आज 9375 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३७५ रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 2913 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5771 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5503 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसी मध्ये आज 2800 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ५४०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6100 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5750 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 4500 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6030 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५४०० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 15881 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5300 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6100रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५७८० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- जालना एपीएमसी मध्ये आज 12268 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या निलावाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4675 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5950 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५५५० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 5932 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार 70 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5600 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.