Soybean Bajarbhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केलं जाणारं एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील काही जिल्ह्यातही शेती (Farming) केली जाते.

जवळपास महाराष्ट्रात सर्वत्र या पिकाची शेती पाहायला मिळते. निश्चितच सोयाबीन या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून आहे. मात्र यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव (Soybean Rate) दबावात आहेत. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

दरम्यान परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. परतीच्या पावसात भिजलेल्या सोयाबीनला अतिशय कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. आज अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सोयाबीनला मात्र 2710 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस घसरण होत असल्याने, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची चिंता वाढत आहे.

आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, यावर्षी सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतच बाजार भाव मिळण्याची शक्यता आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावाची माहिती जाणून घेणार आहोत.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसीमध्ये आज 375 क्‍विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजार भाव देखील तेवढाच आणि सर्वसाधारण बाजार भाव देखील तेवढाच नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- विदर्भातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणजेच नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चार हजार 76 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 111 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 908 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 2351 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे. झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 2710 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दहा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 195 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

भोकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- भोकर एपीएमसीमध्ये आज 1114 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

परतूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 243 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4126 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4670 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.