Soybean Bajarbhav : गेल्यावर्षी सोयाबीनवर चांगला विक्रमी बाजार भाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. मित्रांनो खरं पाहता गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता आणि यामुळे उत्पादनात मोठी घट झाली होती.

उत्पादणात घट झाली शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला कधी नव्हे ती मोठी मागणी आली. हेच कारण होते की गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी बाजारभाव मिळाला. गेल्या वर्षी सोयाबीनला सुरुवातीच्या टप्प्यात 11 हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत होता.

मात्र तदनंतर केंद्र शासनाने सोया पेंड आयात केली आणि यामुळे सोयाबीन दरात मोठी घसरण झाली. मात्र असे असले तरी गेल्या हंगामात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 7000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर शेवटपर्यंत कायम राहिला होता. मात्र या हंगामात सोयाबीन बाजार भाव अगदी सुरुवातीपासून दबावत होते. वायदे बंदी, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची अल्प मागणी तसेच स्टॉक लिमिट या तीन कारणांमुळे सोयाबीनचा तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती सुरुवातीच्या टप्प्यात पाहायला मिळाली.

मात्र केंद्र शासनाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी खाद्यतेल आणि तेल बियांवर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली आहे. यामुळे सोयाबीनच्या दरात गेल्या सहा ते सात दिवसापासून रोजाना वाढ होत असल्याचे चित्र आहे. आज देखील सोयाबीन बाजार भाव तेजीतच आहेत.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोज सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळत असलेल्या बाजारभावाची विस्तृत पण थोडक्यात चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो आज झालेल्या लिलावात उदगीर एपीएमसी मध्ये सोयाबीनचे साडेसात हजार क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 5725 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीनच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 10 हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला ५०५० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5800 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५४७५ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये आज 12,372 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद येथे पीएमसी मध्ये सोयाबीनला 5,200 रुपये प्रतिक्विंटल एवढा किंमत मिळाला असून कमाल बाजार भाव 5442 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5,321 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- विदर्भातील एक महत्त्वाची बाजारपेठ अर्थातच नागपुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 3438 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5590 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5317 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज 19458 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5,300 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5900 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 6,363 क्विंटल एवढी सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4,100 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 6050 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव पाच हजार चारशे प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 1594 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5980 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५४९० रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मुर्तीजापुर एपीएमसी मध्ये आज 5100 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावा ते एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5 हजार 5 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून कमाल बाजारभाव 5800 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव ५४८५ रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.