Soybean Bajarbhav : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने खाद्यतेल आणि तेलबियांवरील स्टॉक लिमिट काढले यामुळे सोयाबीन दरात वाढ होणार असा तज्ज्ञांचा अंदाज होता. झालं देखील तसंच सोयाबीन दरात वाढ झाली. मात्र सोयाबीन दरातील दरवाढ जास्त काळ टिकू शकली नाही.

आता पुन्हा एकदा सोयाबीन दर सहा हजाराच्या आत आले आहेत. आज राज्यातील काही प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता जवळपास सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा कमाल बाजारभाव हा 6000 च्या आत राहिला असून सरासरी बाजार भाव साडेपाच हजाराच्या आसपास पाहायला मिळाला. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला काय दर मिळाला याविषयी जाणून घेणार आहोत.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1604 क्विंटल एवढी सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :– कारंजा एपीएमसी मध्ये आज तीन हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5625 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5410 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- राहता एपीएमसी मध्ये आज 37 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5625 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5550 रुपये नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये आज 5367 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5442 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5296 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 1650 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5275 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज एक हजार क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5250 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5851 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5550 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 15 हजार 57 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार 111 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5700 नमूद करण्यात आला.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6040 क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५४०० रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3431 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4851 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5951 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5401 रुपये नमूद करण्यात आला आहे.

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज दोन क्विंटल पिवळ्या सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल, किमान आणि सरासरी बाजारभाव मिळाला.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 980 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 6050 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजार मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5125 रुपये नमूद करण्यात आला आहे.