Soybean Bajarbhav : मित्रांनो सोयाबीन हे खरीप हंगामातील एक मुख्य पीक असून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे यावर अर्थकारण अवलंबून आहे. मित्रांनो खरं पाहता यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून सोयाबीन बाजार भाव दबावत आहेत. दरम्यान केंद्र शासनाने तेलबिया व खाद्यतेलावर असलेली स्टॉक लिमिट काढून घेतली असल्याने सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. दरम्यान जाणकार लोकांनी देखील दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ होण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती.

आता सोयाबीन दरात जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे दरवाढ होत असल्याचे चित्र आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे देशात आता लगीन घाई सुरू होणार आहे. लग्नसराईत देशात सोया तेलाची मोठी मागणी असते. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या मागणीमध्ये वाढ होण्याचे चित्र आहे. जाणकार लोकांच्या मते लग्नसराईत सोयाबीन तेलाची मागणी वाढणार असल्याने व्यापारी लोकांनी आत्तापासूनच सोयाबीनचा साठा करण्यास सुरवात केली आहे.

दरम्यान सोयाबीन वरील तसेच सोया तेलावरील स्टॉक लिमिट काढले गेले असल्याने. आता उद्योगाकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे खरेदी सुरू झाली आहे. यामुळे येत्या काही दिवसात सोयाबीन दरात अजूनच वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत देशात सुरू झालेल्या लगीन घाईमुळे सोयाबीन दर वाढ थांबणार नसल्याचे चित्र आहे. यामुळे तूर्तास सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिलासा मिळत आहे.

मित्रांनो आता महाराष्ट्रात 5800 ते 5900 प्रतिक्विंटल पर्यंतच्या बाजारभावात सोयाबीन खरेदी केली जाऊ लागली आहे. निश्चितच सध्या मिळत असलेला बाजारभाव गेल्या हंगामाच्या तुलनेत खूपच कमी आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या मिळत असलेल्या बाजारभावात 600 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान काही जाणकार लोकांनी सोयाबीनच्या बाजारभावात अजूनच वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. लग्नसराईत सोयाबीन तेलाची मागणी वाढल्यानंतर सोयाबीनच्या मागणीत देखील मोठी वाढ होणार आहे, यामुळे भविष्यात सोयाबीनच्या भावात अजूनच वाढ होण्याची शक्यता काही जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते या हंगामात सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटल ते 8000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव मिळू शकतो.

मात्र असे असले तरी, जानेवारीच्या टप्प्यात अमेरिकेच सोयाबीन उत्पादन विक्रीसाठी दाखल होणार आहे. यामुळे भविष्यात नेमका सोयाबीनला किती बाजार भाव मिळतो याबाबत अद्यापही स्पष्टपणे सांगता येणं कठीण असल्याचे काही जाणकारांनी नमूद केलं आहे.

निश्चितच सोयाबीन दरात गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत थोडीशी वाढ झाली आहे आणि भविष्यात अजून थोडी वाढ नमूद केली जाण्याचे शक्यता आहे. दरम्यान लग्नसराईचा थोडाफार सोयाबीन बाजाराला आधार मिळणार असल्याचे चित्र आहे. दरम्यान पुढील आठवड्यात सध्या मिळत असलेले बाजारभाव कायम राहण्याची दाट शक्यता आहे.