Soybean Market Price : सोयाबीनचे बाजार भाव (Soybean Bajarbhav) गेल्या काही दिवसांपासून पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बघायला मिळत आहेत. आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Ahmednagar Apmc) सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) थोडीशी सुधारणा बघायला मिळाली असून याठिकाणी सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून सर्वसाधारण बाजार भाव 5200 एवढा नमूद करण्यात आला आहे.

मित्रांनो सद्यस्थितीत मिळत असलेला सोयाबीन बाजार भाव सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Soybean Grower Farmer) अपेक्षेप्रमाणे नाहीये. मात्र सोयाबीनच्या दरात थोडी सुधारणा झाली असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत.

मात्र सोयाबीनच्या बाजारभावात खरच वाढ होईल का हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायम आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे आम्ही आपल्यासाठी रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती घेऊन हजर होत असतो. अशा परिस्थितीत आज देखील आपण सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती जाणून घेणार आहोत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 57 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात अहमदनगर एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 140 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात माजलगाव एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :– अमरावती एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 1143 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव या एपीएमसीमध्ये मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आज या एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे. तसेच पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव अमरावती एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 255 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 835 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 140 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 987 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीनच्या लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनची 3624 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात लातूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 390 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 544 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 935 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 85 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 240 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मुर्तीजापुर एपीएमसीमध्ये आज 690 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 70 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 275 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज मुर्तीजापुर एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 175 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.