Soybean Market Price : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Soybean Grower Farmer) एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मित्रांनो खरे पाहता गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने चढ-उतार बघायला मिळत आहे. महिन्याभरापूर्वी सहा हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होणार्‍या सोयाबीन (Soybean Crop) आता साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटल दरावर येऊन ठेपला आहे.

काल तर सोयाबीन दोन ते तीन बाजार समितीत 3000 ते 3500 रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाला आहे. मात्र आता यामध्ये पुन्हा एकदा थोडीशी सुधारणा बघायला मिळत आहे. सोयाबीन बाजार भावात (Soybean Bajarbhav) जवळपास हजार रुपयांची वाढ झाली असून पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत सोयाबीनला बाजारभाव मिळू लागला आहे.

सध्या मिळत असलेला बाजार भाव निश्चितचं सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) अपेक्षे सारखा नाही. मात्र, सोयाबीनच्या बाजार भावात कालपेक्षा आज सुधारणा बघायला मिळाली असल्याने आगामी काळात सोयाबीनचे बाजारभाव वाढतील अशी आशा सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला मिळालेले बाजारभाव.

राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये साडेतीनशे क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज उदगीर एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार 250 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 281 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला आहे. तसेच बाजार समितीत आज सोयाबीनला पाच हजार 265 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती :- धुळे एपीएमसीमध्ये आज 13 क्विंटल हायब्रीड सोयाबीनची आवक झाली. एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनचा 4205 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून 4815 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज धुळे एपीएमसीमध्ये चार हजार 725 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 549 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. एमपी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4835 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 205 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसीमध्ये आज 46 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 122 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 80 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनचा मिळाला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 130 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीन ला चार हजार 380 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पंधरा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात मलकापूर एपीएमसीमध्ये चार हजार 855 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- गंगाखेड एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 15 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात गंगाखेड एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत कमी बाजार भाव मिळाला असून पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.