Soybean Market Price : आपल्या राज्यात सोयाबीनची (Soybean Crop) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Soybean Grower Farmer) सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) सातत्याने घसरण होत असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. मात्र आता सोयाबीनच्या दरात थोडी वाढ होत असल्याचे चित्र आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी चार हजारापेक्षा कमी दरात सोयाबीनची विक्री होत होती. मात्र आता सोयाबीनला पाच हजार 700 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला साडे पाच हजाराहून अधिक बाजार भाव मिळाला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या भुवया पुन्हा एकदा उंचावल्या आहेत.

मित्रांनो आता हळूहळू बाजारात नवीन सोयाबीन देखील दाखल होऊ लागला आहे. अशा परिस्थिती सोयाबीनच्या दरात होत असलेली सुधारणा सकारात्मक असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. सध्या मिळत असलेला दर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नसला तरी देखील आगामी काळात सोयाबीनच्या दरात सुधारणा होण्याची हे चिन्ह असल्याचे प्रयोगशील शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

मित्रांनो आपण रोजच सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण सोयाबीनचे आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेले बाजार भाव.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो कारंजा एपीएमसी मध्ये आज 1200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज कारंजा एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 790 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 375 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज कारंजा एपीएमसीमध्ये पाच हजार 165 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज 131 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 82 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच आज झालेल्या लिलावात नागपुरी एपीएमसीमध्ये चार हजार 862 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 265 क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे महाराष्ट्र राज्य पणन महामंडळ यांनी नमूद केले आहे. आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5115 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच आज झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव अकोला एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसी मध्ये आज सोयाबीनची 40 क्विंटल आवक झाली. बीड मध्ये सोयाबीनचे बाजार भाव आता चांगलीच सुधारणा झाली. बीड एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीन ला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5742 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव नमूद करण्यात आला आहे. तसेच आज बीड मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला पाच हजार सत्तावीस रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :– मलकापूर एपीएमसीमध्ये आज 93 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात मलकापूर एपीएमसीमध्ये पिवळ्या सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 205 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात मलकापूर एपीएमसीमध्ये चार हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव नमूद करण्यात आला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- केज एपीएमसीमध्ये आज 41 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात केज एपीएमसीमध्ये 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन मिळाला असून पाच हजार 175 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे  तसेच आज या एमपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाल्याचे नमूद करण्यात आले आहे.