Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Farming) केली जाते. मात्र या नगदी पिकातून सध्या शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न (Farmer Income) मिळत आहे.

सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) गेल्या महिन्याभरापासून सातत्याने घसरण होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) मोठा फटका बसत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की गेल्या महिन्याभरापूर्वी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळत होता.

मात्र महिन्याभरापासून सोयाबीनच्या दरात दररोजच घसरण होत असून सध्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत बाजारभाव मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या मते सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीन साठी झालेला खर्च काढण देखील मुश्कील आहे.

मित्रांनो आपण रोजचं सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो आज देखील आपण सोयाबीनचे बाजार भावाविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 142 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 3 हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज सोयाबीनला पाच हजार 351 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 205 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 105 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात सोयाबीन भाव चार हजार 802 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज 4987 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आहे. आज झालेल्या लिलावात ताडकळस एपीएमसीमध्ये चार हजार 728 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनचा किमान बाजार भाव मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 270 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आधी 612 क्विंटल सोयाबीनचे आठवण झाली आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4105 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 5285 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे तसेच पाच हजार 55 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती : कोपरगाव एपीएमसीमध्ये आज सोयाबीनचे 16 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 132 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 5 हजार 1 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज हिंगोली खानगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 286 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात सोयाबीनचा चार हजार 800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 50 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती :- आंबेजोगाई एपीएमसीमध्ये आज 350 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात मलकापूर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून पाच हजार 125 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- एपीएमसीमध्ये 2502 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 870 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये आज 160 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेला लिलावात सोयाबीनला 4 हजार 951 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 122 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 51 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.