Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक मुख्य पीक आहे. सोयाबीनची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Farming) केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते.

अशा परिस्थितीत आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीनचे बाजार भावाची (Soybean Rate) माहिती रोजच घेऊन येत असतो. मित्रांनो आज देखील आपण आजचे नवीन सोयाबीन बाजारभाव (Soybean Bajarbhav) जाणून घेणार आहोत. मित्रांनो खरे पाहता गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. आता बाजारात नवीन सोयाबीन देखील येऊ लागला आहे.

सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी आघात पेरणी केली होती अशा शेतकरी बांधवांचे नवीन सोयाबीन आता बाजारात दाखल होऊ लागले आहे. मात्र सोयाबीनच्या दराचा सुधारणा होतं नसल्याचे चित्र आहे. मित्रांनो गेल्या महिन्याभरापूर्वी सहा हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने विक्री होणारा सोयाबीन आता चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमी झाला आहे.

त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे आर्थिक बजेट कोलमडत असल्याचे चित्र आहे. आज मोर्शी एपीएमसीमध्ये तसेच वरोरा एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे.

त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव आगामी काळात सोयाबीनचे बाजार भाव वाढतील की नाही याबाबत संभ्रमावस्थेत आहेत. मित्रांनो आज आठ सप्टेंबर रोजी राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला कसा बाजार भाव मिळाला याविषयी आता आपण जाणून घेऊया.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनची 74 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या बाजार समितीत सोयाबीन ला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

 नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 120 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपुर एपीएमसी मध्ये सोयाबीन ला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 210 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज झालेल्या लिलावात सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज यां एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 594 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात अकोला एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 240 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला आज या बाजार समितीत मिळाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 133 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये आज 109 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात चिखली एपीएमसीमध्ये चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज यां एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- बीड एपीएमसीमध्ये आज 59 क्विंटल पिवळा सोयाबीनची आवक झाली असून चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच 5171 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. आज या बाजारात सोयाबीनला 4884 प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- वरोरा एपीएमसी मध्ये आज 13 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनचा चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार:- उमरखेड एपीएमसीमध्ये आज 70 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली आहे. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 100 एवढा राहिला आहे.