Soybean Market Price :- सोयाबीनच्या बाजार भावात (Soybean Rate) गेल्या काही दिवसांपासून सतत घसरण होत असल्याचे चित्र होते. मात्र आता राज्यातील एका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) सोयाबीनच्या दरात (Soybean Price) मामुली वाढ बघायला मिळतं आहे.

मित्रांनो खरं पाहता राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनला (Soybean Crop) साडे पाच हजाराच्या आसपास बाजारभाव मिळतं होता. मात्र राज्यातील उमरखेड डांकी या कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये आज झालेल्या सोयाबीन लिलावात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Soybean Grower Farmer) आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

मित्रांनो खरे पाहता सहा हजार रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Farmer) अपेक्षित असा बाजारभाव नसला तरीदेखील यामुळे आगामी काळात बाजार भाव वाढण्याची शक्यता निर्माण होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांकडून सद्यस्थितीला समाधान व्यक्त केले जात आहे.

मित्रांनो आपण रोजच सोयाबीनचे बाजार भावाची माहिती आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी घेऊन येत असतो. अशा परिस्थितीत आज आपण 2 सप्टेंबर 2022 रोजी सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावा विषयी चर्चा करणार आहोत.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती:- उदगीर एपीएमसीमध्ये आज 695 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये 5399 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला असून पाच हजार 352 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5 हजार 375 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज नागपूर एपीएमसीमध्ये 106 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार 272 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून साडे चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच पाच हजार 79 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव सोयाबीनला आज बाजारसमितीत मिळाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज 2 सप्टेंबर रोजी हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची 205 क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. या बाजार समितीत पाच हजार 169 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4984 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या निफाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज 140 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आज सोयाबीनला या ठिकाणी मिळाला आहे. तसेच 4401 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव आज सोयाबीनला या ठिकाणी मिळाला असून पाच हजार 420 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला या ठिकाणी प्राप्त झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 226 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या एपीएमसीमध्ये 5105 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 755 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 930 रुपये प्रति क्विंटल एवढा अनामत करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली बाजार आता 233 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आ सोयाबीनला पाच हजार 31 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे. सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 915 रुपये प्रतिक्विंटल आज चिखली एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती:- दोन सप्टेंबर 2022 रोजी मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आठशे पन्नास क्विंटल आवक नमूद करण्यात आली आहे. या एपीएमसीमध्ये पाच हजार 215 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमीत-कमी बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज मूर्तिजापुर एपीएमसी मध्ये नमूद करण्यात आला आहे.

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- खामगाव एपीएमसीमध्ये आज 2324 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 305 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच चार हजार 952 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- मित्रांनो उमरखेड डांकी या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे. या एपीएमसीमध्ये आज 100 क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून कमीत कमी बाजार भाव 5 हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव आज या एपीएमसीमध्ये पाच हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.