Soybean Rate Maharashtra : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी जो दिवस उजाडतो तो निराशाजनकच. आज देखील सोयाबीन दर दबावातच राहिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची दरवाढीची आशा फोल ठरत आहे.

गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला दर मिळाला यामुळे यावर्षी देखील सोयाबीन चांगल्या बाजारभावात विक्री होईल आणि दोन पैसे पदरी पडतील अशी शेतकऱ्यांची आशा होती. मात्र झालं काही औरच.

दोन पैसे पदरी पडणे तर सोडाच, साधा उत्पादन खर्च काढणे देखील सोयाबीन पिकातून अशक्य बनले आहे. शेतकरी बांधवांना सोयाबीन पिकासाठी झालेला उत्पादन खर्च देखील स्वतः साठवलेल्या पैशातून म्हणजेच पदरमोड करून करावा लागणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

एकीकडे शासन ढोल नगाडे वाजवत 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असा गाजावाजा करत आहे. मात्र, जमिनीवरील परिस्थितीत पाहता 2022 उलटत चालले पण उत्पन्न दुपटीने काही वाढले नाहो. उत्पन्न दुपटीने वाढवन तर सोडा पण शेतकऱ्यांनी जे काही उत्पन्न (पैसा) साठवून ठेवला आहे ते देखील आता संपण्याच्या मार्गावर आहे.

अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांचे उत्पन्न दुपटीने केव्हा वाढेल हा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. निश्चितच सोयाबीन हंगाम सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटत चालला आहे तरी देखील सोयाबीन दरात पाहिजे तशी तेजी आलेली नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत घसरण होत नसली तरी देखील सोयाबीन दरात घसरण होत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी सविस्तर पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीन लिलावासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 5500 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात कारंजा एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5525 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5325 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाची कृषी बाजारपेठ अर्थातच श्रीरामपूर एपीएमसीमध्ये आज 42 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5100 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5325 रुपये नमूद झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 700 क्विंटल सोयाबीनची आवक नमूद झाली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5131 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5560 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5431 रुपये नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये 101 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4411 रुपये प्रतिक्वल एवढा किमान दर मिळाला असून 5510 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5450 रुपये नमूद झाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज नऊ हजार 165 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5478 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5314 रुपये नमूद झाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2593 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5475 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5231 रुपये नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2500 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5,190 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून पाच हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5495 रुपये नमूद झाला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2500 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5850 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 5 हजार 86 क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. माझं झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल बाजार भाव 5770 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5400 नमूद झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1227 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5560 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5380 रुपये नमूद झाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- चिखली एपीएमसीमध्ये 2554 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली आहे. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5851 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5075 रुपये नमूद झाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5080 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5570 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार 5335 रुपये नमूद झाला आहे.