ब्रेकिंग ! 10 वी आणि 12वी चा निकाल जून महिन्यातील ‘या’ तारखेला लागणार, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th 12th Result Maharashtra Board : दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी कामाची बातमी समोर येत आहे.

खरं पाहता, बोर्डाने फेब्रवारी आणि मार्च महिन्यात दहावीच्या आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा घेतल्यात. यात लाखो विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली आहे. परीक्षेनंतर सर्वांनाच आता दहावी आणि बारावीच्या रिझल्ट ची आतुरता लागली आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! आता मुंबईहुन ‘या’ शहरा दरम्यान सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस, खासदार उदयनराजे यांनी घेतला पुढाकार

विद्यार्थ्यांसमवेतच त्यांच्या पालकांना देखील निकालाची चाहूल लागली आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे पालक देखील अगदी चातकाप्रमाणे रिझल्टची वाट पाहत आहेत. दरम्यान आता पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे जून महिन्यात दहावीचे आणि बारावीचे रिझल्ट डिक्लेअर होणार आहेत. रिझल्ट जून महिन्यात डिक्लेअर करण्यासाठी तयारी अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे. रिझल्ट साठी आवश्यक असलेली कामे जवळपास 90% पूर्ण झाली आहेत.

प्रश्नपत्रिका तपासणी पूर्ण झाली असून आता याची पडताळणी सुरू असल्याची माहिती देखील समोर आली आहे. दरम्यान, सकाळ वृत्त संस्थेने बारावीचा निकाल तीन किंवा चार जून रोजी जाहीर होईल असं सांगितलं आहे. तसेच बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दहावीचा निकाल जाहीर करण्यासाठी बोर्डाकडून तयारी केली जाणार आहे.

हे पण वाचा :- कडू कारल्याचा मधुर गोडवा ! प्रयोगशील शेतकऱ्याने 10 गुंठ्यात सुरु केली कारल्याची शेती, 2 लाखांची झाली कमाई, पहा ही यशोगाथा

दहावीचा निकाल बारावीचा निकालानंतर एका आठवड्यात म्हणजेच जवळपास दहा जून पर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. वास्तविक बोर्डाने बारावीचा निकाल मे महिन्याच्या म्हणजे या चालू महिन्याच्या शेवटीपर्यंत डिक्लेअर करण्याचे नियोजन आखले आहे.

मात्र जर मे महिन्याच्या शेवटी निकाल लागला नाही तर चार किंवा पाच जूनला निश्चितपणे निकाल जाहीर होईल अस देखील बोर्डाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आल आहे. निश्चितच आता जून महिन्यात रिझल्ट डिक्लेर होणार हे जवळपास निश्चित झाल आहे. अशा परिस्थितीत आता विद्यार्थ्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहचणार आहे.  

हे पण वाचा :- म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आज निघणार; घरबसल्या म्हाडाची सोडत कशी पाहणार? पहा….