दहावी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी! या विभागात निघाली मोठी भरती; ‘या’ ठिकाणी करा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Government Job : दहावी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की आपण रोजच सरकारी नोकरीची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण तरुणांसाठी सरकारी नोकरीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागात एक पदभरती आयोजित करण्यात आली आहे.

यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली असून लघुलेखक या पदासाठी ही भरती होणार आहे. लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी या पदासाठी ही भरती आयोजित असून या पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती बाबत सर्व आवश्यक माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- शिंदे सरकार ‘या’ एका कारणामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 60 वर्ष करणार, पहा….

कोणत्या अन किती जागांसाठी होणार आहे भरती

महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागात लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी या पदाची भरती आयोजित झाली आहे. या पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी इच्छुक उमेदवाराने किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच स्टेनोग्राफीचा कोर्स संबंधित उमेदवाराने केलेला असणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करायचा?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार https://krishi.maharashtra.gov.in/ या लिंक वर जाऊन अर्ज करू शकणार आहेत.

हे पण वाचा :- संपात सामील झालेल्या 18 लाख कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शिंदे-फडणवीस सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय, पहा….

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या पदासाठी 6 एप्रिल 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून 20 एप्रिल 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे.

कोण कोणती कागदपत्रे लागणार?

अर्जदार उमेदवाराचे बायोडेटा म्हणजे Resume 

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

हे पण वाचा :- चर्चा तर होणारच ! 7 गुंठ्यात स्ट्रॉबेरी शेती सुरू केली लाखोंची कमाई झाली, पहा ही यशोगाथा