10वी पास तरुणांसाठी पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ संस्थेत निघाली मोठी भरती, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Government Job : दहावी पास आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता ज्या तरुणांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही आनदाची पर्वनी राहणार आहे.

कारण की, भारतीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था म्हणजे चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे येथे काही रिक्त जागांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या रिक्त जागासाठी दहावी ते पदवीधर पास उमेदवार पात्र राहणार आहेत. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत सर्व आवश्यक माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाब डख नवीन अंदाज; आजपासून ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार, काही भागात गारपीट देखील होणार, पहा काय म्हणताय डख

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार आहे भरती?

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था पुणे या संस्थेत कॅमेरामन, ग्राफिक आणि व्हिज्युअल असिस्टंट, फिल्म एडिटर, मेक-अप आर्टिस, प्रयोगशाळा सहाय्यक, संशोधन सहाय्यक, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, उत्पादन सहाय्यक, सहाय्यक देखभाल अभियंता, ध्वनी रेकॉर्डिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रात्यक्षिक, लघुलेखक, उच्च विभाग लिपिक, मेकॅनिक, हिंदी टायपिस्ट लिपिक, सुतार, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशियन, पेंटर, तंत्रज्ञ, मल्टी टास्किंग स्टाफ, स्टुडिओ असिस्टंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

हे पण वाचा :- राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; अभ्यास समिती जुनी पेन्शन योजना आणि सेवानिवृत्तीच्या वयाबाबत शासनाला देणार ‘हा’ अहवाल?

किती जागांसाठी होणार भरती?

या पदभरती प्रक्रिया अंतर्गत तब्बल 84 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

वर नमूद केलेल्या विविध पदांसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता राहणार आहेत. त्यामुळे शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा http://ftii.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक उमेदवाराला भेट द्यावी लागणार आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी 25 ते 50 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्यातील विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत शिक्षण विभागाने घेतला मोठा निर्णय, आता…..

अर्ज कसा करावा लागणार

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. http://ftii.ac.in या चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन उमेदवार आपला अर्ज सादर करू शकणार आहेत.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी मात्र 29 मे 2023 पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे. 29 मे नंतर उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाही म्हणून जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील त्यांनी लवकरात लवकर भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करायचा आहे. 

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! इंडियन ऑइल मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच करा अर्ज