10वी पास तरुणांसाठी खुशखबर; पुण्यात ‘या’ ठिकाणी आहे नोकरीची संधी, इथे पाठवा अर्ज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

10th Pass Job In Pune : दहावी पास तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पुण्यात नोकरींच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी तर ही एक आनंदाची पर्वनीच राहणार आहे. कारण की, पुणे येथे मुख्यालय दक्षिणी कमांड या ठिकाणी रिक्त पदांसाठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीच्या माध्यमातून 78 रिक्त पदांची भरती होणार आहे. दरम्यान आज आपण नेमक्या कोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता काय राहणार आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक यांसारखी महत्त्वाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- कलिंगड शेतीने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा; 10 गुंठ्यातला प्रयोग ठरला लाख मोलाचा, पहा ही यशोगाथा

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

मुख्यालय दक्षिणी कमांड येथे सिव्हिलियन स्विच बोर्ड ऑपरेटर ग्रेड-II, गट ‘क’ या पदाच्या एकूण 78 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण असावा. उमेदवाराला हिंदी आणि इंग्रजी भाषेच ज्ञान असावं. शैक्षणिक पात्रते संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा मात्र अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.

किती वेतन मिळणार?

या पदासाठी 21,700 प्रति महिना मानधन मिळणार असल्याची माहिती सदर अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. 

हे पण वाचा :- पुणे, कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी ! कोकण रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….

अर्ज कसा करायचा?

या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज हा प्रभारी अधिकारी, दक्षिण कमांड सिग्नल रेजिमेंट, पुणे (महाराष्ट्र) पिन – 411001 या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना सात मे 2023 पर्यंत आपला अर्ज पाठवता येणार आहे. विहित कालावधीनंतर पाठवलेला अर्ज कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरला जाणार नाही याची दक्षता मात्र सदर उमेदवाराला घेणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ शेतकऱ्यांना विहिरीसाठी अडीच लाख अन शेततळ्यासाठी 1 लाख रुपये अनुदान मिळणार; तुम्हाला लाभ मिळणार का? पहा…..