Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

12वी पास अन Typing कोर्स केलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ! ‘या’ विद्यापीठात मोठी भरती सुरू, पहा….

12th Pass Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता या तरुणांनी टायपिंग चा कोर्स केलेला असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे.

12th Pass Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषता या तरुणांनी टायपिंग चा कोर्स केलेला असेल अशा तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे. कारण की, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठामध्ये टायपिंग येणाऱ्या उमेदवारांना नोकरीं करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. या विद्यापीठाने असिस्टंट कम टायपिस्ट या पदासाठी भरती काढली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

विशेष बाब म्हणजे यासाठीची अधिसूचना विद्यापीठाच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित देखील करण्यात आली आहे. यानुसार, असिस्टंट कम टायपिस्ट या पदाच्या तब्बल 200 रिक्त जागा विद्यापीठाच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! मुंबईमधल्या ‘या’ अतिमहत्त्वाच्या रेल्वे स्टेशनचा होणार कायापालट, केलं जाणार ‘हे’ महत्वाचं काम, असा होणार प्रवाशांचा फायदा

कोणत्या अन किती पदासाठी आहे भरती?

जुनिअर असिस्टंट कम टायपिस्ट या पदाच्या तब्बल दोनशे रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराने बारावीचे शिक्षण मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून घेतलेले असणे गरजेचे आहे. तसेच सदर उमेदवाराला इंग्रजी टायपिंग आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे. इंग्लिश टायपिंग 40 डब्ल्यू पी एम आणि हिंदी टायपिंग 30 डब्ल्यू पी एम. आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा?

18 ते 27 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहणार आहे. शिवाय रिजर्व कॅटेगरी मधील उमेदवारांना नियमानुसार या ठिकाणी सूट राहणार आहे.

उमेदवाराची निवड कशी होणार?

लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणीच्या आधारे उमेदवाराची निवड होणार आहे. तसेच उमेदवाराची वैद्यकीय चाचणी देखील होईल आणि डॉक्युमेंट वेरिफिकेशन देखील केले जाणार आहे.

हे पण वाचा :- पंजाबराव डख हवामान अंदाज; हवामानात अचानक झाला मोठा बदल, 21 एप्रिलपासून पुन्हा ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार ! पहा….

किती मिळणार पगार?

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रुपयांपर्यंतचे वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा?

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. https://examinationservices.nic.in/recsys23/root/Home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFYCztFlNKyqcTW1qzg34UFs9mm1k9K882sSFo9l2HtuD या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकणार आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 20 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. विहित कालावधीमध्येच उमेदवाराने अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर अर्ज सादर करता येणार नाही. 

हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ सरकारी विभागात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 32 हजार, पहा….