7th Pay Commission : खरं काय…! ‘या’मुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात होणार 4% वाढ ; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission :- मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ दिल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्त्यात वाढ मिळत असते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना नुकताच जुलै महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता चा लाभ दिला जात आहे. जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांना सदर महागाई भत्ता वाढ सप्टेंबर महिन्यापासून रोखीने अदा केली गेली आहे.

जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढ दिली जावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान आता देशातील इतरही राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात आहे. यामध्ये आत्ता हरियाणा राज्याचा देखील समावेश झाला आहे. हरियाणा राज्य शासनाने आपल्या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना चार टक्के दराने महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला आहे.

आता हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. विशेष म्हणजे हरियाणा राज्याने लागू केलेली सदर महागाई भत्ता वाढ जुलै महिन्यापासून लागू झाली आहे आणि वाढीव महागाई भत्ता ऑक्टोबर महिन्यापासून राज्य कर्मचाऱ्यांना देऊ केला जात आहे. हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील जुलै ते सप्टेंबर या महिन्यातील महागाई भत्ता थकबाकी देखील देऊ करण्यात येत आहे. हरियाणा राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ झाली आहे.

दरम्यान हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला असल्याने महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जावा ही मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते हरियाणा राज्यात आगामी काही दिवसात मतदानाची प्रक्रिया सुरू होणार असल्याने राज्य शासनाकडून राज्य कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सदर निर्णय घेण्यात आला आहे. एकंदरीत आता हरियाणा राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला गेला असल्याने आपल्या राज्यातील राज्य कर्मचारी देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळवण्यासाठी आक्रमक भूमिका घेणार असल्याचे घेतले जात आहे.

एकंदरीत देशातील बहुतांशी राज्यात महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असल्याने महाराष्ट्रात देखील लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाईल असे जाणकार नमूद करत आहे. महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना सध्या 34 टक्के दराने महागाई भत्ता लाभ मिळत आहे. यामध्ये चार टक्के महागाई भत्ता वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच चार टक्के वाढ झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. निश्चितच असे झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून त्यांना याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे.