Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! मुख्यमंत्री शिंदे घेणार मोठा निर्णय; ‘या’ दिवशी महागाई भत्त्यात होणार 4% वाढ, तारीख झाली फिक्स, पहा….

7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच वाढवण्यात आला आहे. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. याआधी महागाई भत्ता 38% दराने मिळत होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

म्हणजे यामध्ये चार टक्के वाढ करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ देणे आवश्यक आहे. दरम्यान याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना येत्या महिन्यापासून महागाई भत्ता वाढीचा प्रत्येक्ष लाभ मिळणार आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! पती निधनानंतर खचून न जाता शेती सांभाळली; सफरचंदाच्या लागवडीतून झाली लाखोंची कमाई, पहा….

आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर 42 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणार असून वाढलेला महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून लागू राहणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार नुकतीच राज्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

या भेटीत कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली असून लवकरच राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला पाहिजे अशी देखील मागणी या कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील यावर सकारात्मकता दर्शवली आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा हवामान अंदाज; आजपासून ‘या’ भागात पडणार अवकाळी पाऊस !

त्यामुळे पुढल्या महिन्याच्या वेतन देयकासोबत आता वाढीव महागाई भत्ता लाभ दिला जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. एकंदरीत सदर मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा जर खरा ठरला तर डी.ए वाढीचा लाभ पुढील महिन्यापासून राज्यातील सर्वच शासकीय, अनुदानित शाळांमधील कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना मिळणार आहे.

तसेच ही वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय राहणार असल्याने जानेवारी महिन्यापासूनची महागाई भत्ता फरकाची रक्कम म्हणजे थकबाकी देखील राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याच्या वेतन देयकासोबत देऊ केली जाणार आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शिंदे सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत घेतला ‘हा’ मोठा निर्णय; पहा….