नवीन वर्षात सरकारी कर्मचारी बनणार मालामाल ! सरकार घेणार ‘हे’ महत्त्वाचे निर्णय ; वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सध्या राज्यात जुनी पेन्शन योजनेबाबत राज्य कर्मचारी आक्रमक झाले आहेत.  2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

या नवीन पेन्शन योजनेत बहुसंख्य दोष असल्याने ही योजना रद्दबातल करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने केली जात आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्ट मध्ये 2024 मध्ये लोकसभा निवडणुकाचा बिगुल वाजणार असल्याने नवीन पेन्शन योजनेत केंद्र शासनाच्या माध्यमातून सुधारणा केली जाण्याची शक्यता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

तसेच काही मीडिया रिपोर्ट मध्ये महाराष्ट्र राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांचा रोष पाहता जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याची बतावणी करण्यात आली आहे. त्यामुळे या नवीन वर्षात राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली तर निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुलै महिन्यापासून महागाई भत्ता वाढ देणे अपेक्षित असून लवकरच याबाबत देखील सकारात्मक विचार होणार आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत असून जुलै महिन्यापासून 38 टक्के दराने महागाई भत्ता आहे वाढ अनुज्ञेय केली जाणार आहे.

तसेच ज्या महिन्यात ही महागाई भत्ता वाढ अनुज्ञेय होईल तेव्हा जुलै महिन्यापासून त्या महिन्यापर्यंतचा महागाई भत्ता थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या महागाई भत्ता वाढीवर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

पुढील वर्षी महागाई भत्त्यात होणार वाढ 

खरं पाहता कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना मिळत असते. महागाई भत्ता वाढीचा लाभ AICPI च्या इंडेक्सनुसार मिळत असतो.

दरम्यान नवीन वर्षातील जानेवारी महिन्यात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चार ते पाच टक्के महागाई भत्ता वाढ मिळणार आहे. म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 42 ते 43% महागाई भत्ता मिळणार आहे. तसेच पुढील वर्षातील जुलै महिन्यात देखील महागाई भत्ता वाढ होणे अपेक्षित आहे.

म्हणजेच पुढील वर्षअखेर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ होईल. जवळपास 46 ते 48 टक्क्यांपर्यंतचा महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आठ ते दहा टक्के वाढ अजून होणे अपेक्षित आहे. यामुळे नवीन वर्षात कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.