राहुल गांधी सोडवणार राज्य कर्मचाऱ्यांचा तिढा ; राज्य कर्मचारी भारत जोडो यात्रेत ! जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी यात्रेला पाठिंबा ; मागणी होणार पूर्ण ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो या यात्रेची सुरुवात केली आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात सुरू आहे. भारत छोडो यात्रा 71 व्या दिवशी अकोला जिल्ह्यातील पातुर या ठिकाणाहून सुरू झाली.

या दिवसाच्या यात्रेची सर्वात मोठी हायलाईट राज्य कर्मचारी बनले आहेत. खरं पाहता या 71 व्या दिवसाच्या यात्रेला राज्य कर्मचाऱ्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्यातील जवळपास दहा हजार शासकीय तसेच निमशासकीय कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या या आपल्या महत्त्वाच्या मागणीसाठी भारत जोडो यात्रेला म्हणजेच राहुल गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी यात्रेत सहभागी झालेत.

यामुळे सध्या जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. राज्य कर्मचाऱ्यांचा राहुल गांधींना पाठिंबा त्यामुळे राज्य शासनावर दबाव वाढेल आणि जुनी पेन्शन योजना लवकरच लागू होईल असे चर्चांचे सत्र देखील सर्वत्र पाहायला मिळत आहे. झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे आणि या राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील जुनी पेन्शन योजना अनुज्ञेय केली जावी अशी मागणी राज्य कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. या मागणीला अधिक बळ मिळावे तसेच राज्य शासनाने आपली मागणी गांभीर्याने घ्यावी या अनुषंगाने राज्यभरातील आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागातील शासकीय निमशासकीय जवळपास दहा हजार कर्मचारी भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते.

विशेष म्हणजे आतापर्यंत राज्य कर्मचाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आंदोलने केली आहेत मात्र आता राज्य कर्मचारी पवित्रा घेणार असल्याचे चित्र आहे. यात्रेत सहभागी झालेल्या राज्य कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर लागू केली जावी अन्यथा राज्य कर्मचारी तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.