सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय; पगारात होणार तब्बल 8000 ची वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्य कर्मचाऱ्यांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे. खरं पाहता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात केंद्र शासनाच्या माध्यमातून महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला आहे.

मार्च महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ करण्यात आली आहे. म्हणजे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्के झाला आहे. विशेष म्हणजे ही DA वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी रक्कम देखील मिळाली आहे.

हे पण वाचा :- महाराष्ट्रातील जनतेसाठी चिंताजनक ! यंदा मान्सून काळात ‘असं’ होणार, शेतकऱ्यांच मोठं नुकसान होईल; पंजाबराव डख यांचा नवीन मान्सून अंदाज

दरम्यान आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. वास्तविक सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढ दिली जाते. या पार्श्वभूमीवर आता जुलै महिन्यापासून देखील महागाई भत्ता वाढवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ होणार आहे.

म्हणजे आता जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46% बनणार आहे. याची घोषणा मात्र ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात एका केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 46 टक्के महागाई भत्ता करण्यासाठी परवानगी शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे.

हे पण वाचा :- ब्रेकिंग ! आता महाराष्ट्रात NA टॅक्स लागणार नाही; महसूल मंत्री विखे पाटलांची मोठी घोषणा

राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार चार टक्के डीएवाढ

तसेच काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये राज्य कर्मचाऱ्यांना देखील लवकरच डीए वाढ मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने DA दिला जात असून राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 42 टक्के दराने डीए आता दिला जाणार आहे.

याची घोषणा येत्या काही दिवसात शिंदे फडणवीस सरकार करेल असा दावा देखील मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे. विशेष म्हणजे ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता फरकाची रक्कम यावेळी मिळणार आहे. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना देखील मोठा आर्थिक फायदा होणार असल्याचे चित्र आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ जिल्ह्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा