महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! आठवा वेतन आयोगात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार ?

महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी आजची बातमी फारच खास राहणार आहे. कारण म्हणजे आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या सरकारी नोकरदार मंडळीचा पगार किती वाढणार याबाबत एक नवीन अपडेट हाती आले आहे.

Updated on -

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ही बातमी राज्यातील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी फारच महत्त्वाची राहणार आहे. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार ? याबाबत तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल तर मग आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी.

खरे तर केंद्रातील सरकारने जानेवारी महिन्यात आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून येत्या काही दिवसांनी आठव्या वेतन आयोगाची स्थापना केली जाणार आहे. आठवा वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर नव्या वेतन आयोगाच्या समितीच्या माध्यमातून सरकारकडे शिफारशी सुपूर्द केल्या जाणार आहेत.

खरे तर, वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत आला आहे. सध्याचा सातवा वेतन आयोग हा 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे.

यानुसार 31 डिसेंबर 2025 रोजी सध्याचा सातवा वेतन आयोग समाप्त होईल आणि त्यानंतर मग 1 जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला केंद्रातील सरकारकडून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल आणि त्यानंतर मग महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.

मात्र राज्य कर्मचाऱ्यांना देखील एक जानेवारी 2026 पासूनच आठवा वेतन आयोग लागू केला जाईल म्हणजेच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळणार आहे.

दरम्यान आता आपण आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील, माध्यमिक शाळेतील आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार याचा आढावा घेणार आहोत.

महाराष्ट्रातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार ?

जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यातील कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात 2.0 फिटमेंट फॅक्टर लागू केला जाऊ शकतो. असे झाल्यास आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा 34 हजार दोनशे रुपये एवढा होणार, सध्या राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा 29 हजार दोनशे रुपये एवढा आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार कितीने वाढणार?

माध्यमिक शाळेतील शिक्षकांबाबत बोलायचं झालं तर आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर या संबंधित शिक्षकांचा किमान मूळ पगार हा 40,800 रुपये इतका होईल. त्याचवेळी आपण उच्च माध्यमिक शिक्षकांचा विचार केला तर या संबंधित नोकरदार किमान मुळ पगार हा 50,700/- रुपये इतका होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News