4 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ 2 कार आहेत मध्यमवर्गीयांची पहिली पसंत ; मायलेज अन फिचर्स कसे आहेत ? वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Affordable Cars In India : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच फायद्याचा ठरणार आहे. खरेतर, भारतात दमदार मायलेज आणि अफॉर्डेबल प्राईसची कार खरेदी करण्याला विशेष महत्त्व दाखवले जाते. मध्यमवर्गीय चांगले मायलेज अन परवडणाऱ्या कारच्या शोधात असतात. जर तुम्हीही कमी बजेट मध्ये कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे.

कारण की आज आपण चार लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या कारची माहिती पाहणार आहोत. भारतीय कार बाजारात अनेक कंपन्यांनी परवडणाऱ्या कार लॉन्च केल्या आहेत. मात्र चार लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असणाऱ्या कार फारच कमीच आहेत.

चार लाख रुपये किंमत असणारी कार

बजाज Qute : बजाज ही देखील एक प्रमुख ऑटो कंपनी आहे. या कंपनीची बजाज Qute ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. या गाडीची एक्स-शोरूम किंमत फक्त 3.61 लाख रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. हे CNG आणि पेट्रोल या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ही कार RE60 या नावाने देखील ओळखली जाते. ही गाडी ऑटो रिक्षाची 4 चाकी आवृत्ती आहे असं आपण म्हणू शकतो. या गाडीचे मायलेज पेट्रोलवर 35kmpl आणि CNG वर 43km/kg असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.

Maruti Alto K10 : मारुती ही भारतातील एक नामांकित ऑटो कंपनी आहे. ही कंपनी भारतात सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने मारुती अल्टो के टेन ही लो बजेट कार लाँच केली आहे. या कारच्या एंट्री लेव्हल मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ही फक्त 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

ही कार चार प्रमुख प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. Std, LXi, VXi आणि VXi+. लोअर-स्पेक LXi आणि VXi ट्रिम देखील CNG किटच्या पर्यायासह येतात. मारुतीने ही कार सात मोनोटोन कलर पर्यायांमध्ये लाँच केली आहे. या गाडीमध्ये 214 लीटरची बूट स्पेस देण्यात आले आहे.

यात 1-लिटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आहे, जे 67 पीएस पॉवर आणि 89 एनएम टॉर्क जनरेट करत असल्याचा दावा केला जातो. ही कार 5-स्पीड मॅन्युअल किंवा 5-स्पीड AMT सह येते. याव्यतिरिक्त, 57 PS आणि 82 Nm च्या आउटपुटसह एक CNG प्रकार देखील उपलब्ध आहे, जो केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आला आहे.

या गाडीचे पेट्रोल MT मॉडेल 24.39 kmpl, पेट्रोल AMT मॉडेल 24.90 kmpl, LXi CNG मॉडेल 33.40 km/kg आणि VXi CNG मॉडेल 33.85 km/kg चे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून केला जात आहे.