Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीककर्ज, कोणत्या पिकाला किती कर्ज? पहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Agriculture Crop Loan Hike : शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी भांडवल आवश्यक असते. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून अपेक्षित कमाई होत नाहीये. परिणामी शेतीसाठी आवश्यक भांडवल शेतकऱ्यांकडे नसते.

Agriculture Crop Loan Hike : शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी भांडवल आवश्यक असते. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायातून अपेक्षित कमाई होत नाहीये. परिणामी शेतीसाठी आवश्यक भांडवल शेतकऱ्यांकडे नसते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बँकांकडून पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

दरम्यान आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाढीव पीक कर्ज बँकांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेती व्यवसायात असणारी पैशांची गरज पूर्ण करता येणार आहे. सोलापूर जिल्हा तांत्रिक समितीने शेतकऱ्यांना वाढीव पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! आता 10 ते 15 दिवसांत मिळणार कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट; ‘या’ ठिकाणी करा अर्ज, ही कागदपत्रे तयार ठेवा, पहा…..

यासंबंधीचे आदेश काल अर्थातच बुधवारी निर्गमित झाले आहेत. साहजिकच यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या सर्वच शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. म्हणजे आता राष्ट्रीयीकृत बॅंकांसह जिल्हा बॅंकेने मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बहुतेक पिकांच्या कर्जवाटपाची मर्यादा वाढवली आहे. आता या निर्णयानुसार नव्या आर्थिक वर्षात म्हणजेच एक एप्रिल ते 31 मार्च पर्यंत वाढीव पीक कर्ज जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर होणार आहे. दरम्यान आता आपण कोणत्या पिकाला किती पीक कर्ज या आर्थिक वर्षात मिळेल याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा अंदाज पुन्हा ठरला खरा ! आता पुढचा अंदाज नेमका काय? केव्हा थांबणार पावसाचं थैमान, पहा पंजाब डख काय म्हणताय…..

या पिकासातठी मिळणार इतकं पीक कर्ज (हेक्टरी)

 • बाजरी पिकाला हेक्टरी २३ हजार १०० रुपये
 • भुईमूग ३४ हजार रुपये
 • तूर ३६ हजार ८०० रुपये
 • कापूस ४९ हजार रुपये
 • मका२९ हजार ७०० रुपये
 • टरबूज-कलिंगडसाठी ५५ हजार
 • फुलशेतीला ३५ ते ५१ हजार ७०० रुपये
 • शेवग्यासाठी ३३ हजार रुपये
 • वांग्यासाठी ५१ हजार ७०० रुपये
 • तसेच गव्हाला हेक्टरी ३६ हजार ३०० रुपये
 • उसाला आडसाली असल्यास हेक्टरी एक लाख २६ हजार ५०० रुपये 
 • पूर्वहंगामी व सुरू उसाला एक लाख २१ हजार
 • चिकूसाठी ७७ हजार
 • पडवळे-कारल्यासाठी हेक्टरी ३३ ते ३८ हजार रुपये
 • भाजीपाल्यासाठी हेक्टरी सहा हजार ६०० रुपये

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! एनपीसीआईएलमध्ये ‘या’ 325 रिक्त जागांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

याशिवाय, पशुपालक शेतकऱ्यांना देखील कर्ज या ठिकाणी मंजूर होणार आहे. त्यामध्ये एक गाय असलेल्या शेतकऱ्यांना 35000, एक म्हैस असलेल्या शेतकऱ्यांना 37000, शेळीमेंढी किमान दहा शेळ्या अन एक बोकड असलेल्या शेतकऱ्यांना एक लाख १० हजार रुपये, कुक्कुटपालन करणाऱ्या अन किमान १०० कोंबड्यां असलेल्या पशुपालकांना २७ ते ७५ हजार रुपयांचे कर्ज बँकांच्या माध्यमातून या नवीन आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिले जाणार आहे. निश्चितच बँकांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या नवीन निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ राज्य कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेतनाबाबत मोठी अपडेट; शासन निर्णय निर्गमित, पहा….