Agriculture News : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला! ‘या’ महिन्यात करा उन्हाळी धानाची रोवणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : भात पीक हे भारतात उत्पादित केले जाणार एक मुख्य पीक आहे. याची शेती भारतातील बहुतांशी राज्यात केली जाते. महाराष्ट्रातील कोकणात देखील भात पिकाची शेती विशेष उल्लेखनीय आहे. याशिवाय राज्यातील काही इतरही विभागात भात शेती पाहायला मिळते. ज्या ठिकाणी पाण्याची मुबलक प्रमाणात सोय असते अशा बागायती भागात भात पिकाची लागवड शेतकरी बांधव प्रामुख्याने करत असतात.

दरम्यान, उन्हाळी हंगामात धान म्हणजे भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून एक मोलाचा सल्ला जारी करण्यात आला आहे. खरं पाहता धानाची लागवड आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामात तसेच उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात केली जाते. दरम्यान काही शेतकरी बांधवांनी जानेवारी महिन्यातच उन्हाळी हंगामातील धानाची रोवणी सुरू केली आहे.

मात्र जानेवारीमध्ये धानाची रोवणी हे शेतकऱ्यांनी करू नये असा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जात आहे. खरं पाहता महाराष्ट्रातील बहुतांशी भागात खरीप हंगामाची काढणी झाल्यानंतर धान पिकाचे पन्हे टाकून जानेवारीच्या प्रारंभापासूनच रब्बीच्या धान रोवणीला सुरुवात करतात. असे केल्याने मात्र धान पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट येत असते असा दावा कृषी तज्ञांनी केला आहे.

खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर जमिनीतील ओलावा कायम राहतो. यामुळे जमिनीला काही काळ धूप खात राहू दिले पाहिजे. त्यामुळे जमिनीला उसंत, विश्रांती भेटते. शेतीजमिनीतील हानिकारक बुरशी यामुळे नष्ट होत असते. मात्र शेतकरी बांधव जमिनीला काही काळ उसंत खाऊ न देता खरिपातील पीक काढणी झाल्यानंतर लगेचच शेतजमिनीची मशागत करून धान रोवणी करत असतात.

यामुळे मात्र उन्हाळी हंगामातील धान पिकावर खोडकीड, तुडतुडे आणि गादमाशी यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. परिणामी शेतकरी बांधवांच्या उत्पादन खर्चात वाढ होते. या कीटकांच्या आणि रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना कीटकनाशकांवर अधिकचा खर्च करावा लागतो. शिवाय कीटकनाशक फवारल्यामुळे पिकाचा दर्जा खालावतो तसेच जमिनीचा पोतदेखील ढासाळतो.

परिणामी शेतकरी बांधवांना उन्हाळी हंगामातील धानाची रोग ही जानेवारीअखेर करण्याचा सल्ला कृषी तज्ञांकडून देण्यात आला आहे. निश्चितच खरीप हंगामातील पीक काढणे झाल्यानंतर लगेचच धान रोवणी केल्यास यांच्या उत्पादन खर्चात वाढ होते उत्पादनात घट होते शिवाय यामुळे जमिनीवर विपरीत परिणाम होतो. यामुळे तज्ञ लोकांनी उन्हाळी हंगामातील धानाची रोवणी जानेवारीअखेर पासून केली पाहिजे असा सल्ला दिला आहे.