शेतसाऱ्याबाबत भूमी अभिलेख विभागाचा मोठा निर्णय; आता शेतकऱ्यांना मिळणार ‘ही’ सवलत

Agriculture News : भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शेत साऱ्या बाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरं पाहता, शेतसारा हा शेतीजमिनीविषयक कर असतो. हा शेतसारा शेतकऱ्यांकडून वसूल केला जातो. दरम्यान आता हा शेतसारा शेतकऱ्यांना ऑनलाइन भरता येणार आहे. प्रॉपर्टी टॅक्स म्हणजेच मिळकत कराच्या धरतीवर आता शेतसारा देखील ऑनलाईन आकारला जाणार आहे.

यासाठी पुणे जिल्ह्यातील एकूण 314 गावात प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान या 314 गावातील माहिती भरण्याचे काम सध्या स्थितीला सुरू आहे. आता हा शेतसारा ऑनलाइन भरता यावा यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने ई-चावडी या ऑनलाइन प्रणाली मध्येच ही व्यवस्था करण्याचं नियोजन आखलं असून त्या अनुषंगाने काम सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

खरं पाहता प्रत्येक जिल्ह्यात किंवा महसूल विभागात रजिस्टर नमुना लिहिण्याची पद्धत ही खूपच बदल आहे. त्यामुळे यासाठी अडचणी येत आहेत मात्र त्या अडचणी सोडवून लवकरच हे काम पूर्ण केलं जाणार आहे. एवढेच नाही तर नॉन एग्रीकल्चरल लँड म्हणजेच एनए किंवा अकृषी जमिनीसाठी देखील अशा पद्धतीने कर आकारण्यासाठी प्रणाली विकसित केली जाणार आहे. यासाठी शहरालगत असलेल्या गावांची निवड केली जाणार असून चाचपणी केली जाणार आहे.

दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शेतसारा हा अत्यल्प कर असल्याने याची वसुली ही वेळेत होत नाही. मात्र वसुली वेळेत होत नसल्याने यामुळे कर अधिक होतो. अशा परिस्थितीत हा शेतसारा शेतकऱ्यांना जर ऑनलाईन भरता आला तर शेतसाऱ्याची वसुली वेळेत होईल आणि शेतकऱ्यांना देखील याची सोय होईल.

निश्चितच नजीकच्या काळात ईतरही जिल्ह्यात याप्रमाणे शेतसरा ऑनलाईन भरता येणार असल्याचं मत काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत, सर्वच शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि लवकरात लवकर कामे पूर्ण केली जावीत या अनुषंगाने ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे काम सुरू आहे. शेतसारा देखील आता ऑनलाईन भरता येण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. यामुळे शेतसारा भरताना शेतकऱ्यांना सोयीचे होणार आहे.