अब ये बात तो दूर तलक जायेगी ! युवा शेतकऱ्याचा अफलातून प्रयोग ; पिकावर चक्क देशी दारुचीं केली फवारणी, आता पीक आलं फुल टू जोमात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : दारू मानवाच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागलेत. दारू पैसा, शरीर याची राख रांगोळी करणार म्हणून आतापर्यंत ओळखत आलो आहोत. मात्र दारू ही फक्त नुकसानदायकचं आहे असं नाही तर आता तिचे फायदे देखील पुढे येऊ लागले आहेत. खरं पाहता भंडारा जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने पिकावर टॉनिक म्हणून चक्क देशी दारूचे फवारणी केली आहे.

विशेष म्हणजे टॉनिक म्हणून फवारण्यात आलेल्या देशी दारूमुळे या पठ्याचे पीक फुल टू जोमात आलं असून या प्रयोगाचीं सर्वत्र झिंगाट चर्चा रंगली आहे. जिल्ह्यातील लाखनी तालुक्याच्या जेवणाळा येथील एका अवलिया शेतकऱ्याने देशी दारूचा उपयोग हा कीटकनाशक म्हणून केला आहे. रामदास गोंदोळे असं या प्रयोगशील शेतकऱ्याचं नाव असून त्याने आपल्या धानाच्या नर्सरीवर हा प्रयोग केला आहे.

रामदास यांनी केलेल्या दाव्यानुसार धानाच्या नर्सरीवर देशी दारूची कीटकनाशक म्हणून त्यांनी फवारणी केली आणि विशेष म्हणजे यामुळे धानाची रोपे उपमुक्त झाली आहेत. दरम्यान या तरुण शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोग अगदी वनव्याप्रमाणे पंचक्रोशीत पसरला आहे. आता शेतकरी बांधव हा प्रयोग करून पाहायला काय हरकत नसल्याचे बोलत आहेत. खरं पाहता लाखनी परिसरात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते.

उन्हाळी धानाची देखील परिसरात मोठ्या प्रमाणात रोवणी होते. दरम्यान सध्या लाखनी परिसरात उन्हाळी धान रोवणीसाठी रोपांची तयारी केली जात आहे. सध्या स्थितीला नर्सरी मध्ये धानाची रोप वाढत आहेत. अशातच वातावरणात वाढत असलेली उष्णता आणि धुके यामुळे धानाच्या रोपांवर विपरीत परिणाम पाहायला मिळत आहे. रोप पिवळी पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव वेगवेगळ्या औषधांची पिकावर फवारणी करत आहेत.

मात्र रामदास यांनी इतर औषधांचीं फवारणी करण्याऐवजी चक्क देशी दारूची फवारणी केली आहे. विशेष म्हणजे रामदास यांनी केलेल्या दाव्यानुसार यामुळे धानाची रोपे किडमुक्त झाली आहेत. रामदास यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी धानाच्या नर्सरीवर एक पंप फवारणीसाठी 90 मिली. देशी दारू व सोबत एक पाव युरिया एकत्र घेऊन नर्सरीवर फवारणी केली. यामुळे रोपांची वाढ चांगली झाली आणि लवकरच रोप रोवणीसाठी म्हणजेच लागवडीसाठी योग्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

खरं पाहता या युवा शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग नवखा नाही. यापूर्वी देखील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांवर देशी दारू फवारणीचा असा प्रयोग करून पाहिला आहे. दरम्यान शास्त्रज्ञ मात्र देशी दारू फवारणीमुळे पिकावर काही चांगला परिणाम होतो असं स्पष्टपणे सांगत नसले तरी देखील याला त्यांचाही विरोध पाहायला मिळत नाही. दरम्यान या युवा शेतकऱ्याचा हा देशी जुगाडू कीटकनाशक त्याच्यासाठी फायद्याचा ठरल्याच त्याचं मत असून इतर प्रयोगशील शेतकरी देखील प्रयोग करून पाहायला काही हरकत नाही अस बोलत असल्याचे चित्र आहे.

पुणेकरांचा नाद नाही करायचा ! प्रयोगशील शेतकऱ्याने वयाच्या 79व्या वर्षी फुलवली फळबाग ; आता होतेय लाखोंची कमाई, पहा ही भन्नाट यशोगाथा