शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग 1, NA करण्याची नामी संधी; खर्च लागणार मात्र ‘इतका’, पहा अर्ज करण्याची पद्धत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : शेतकऱ्याची खरी ओळख ही त्याच्या जमिनीवरून होत असते. किती जमीन नेमकी शेतकऱ्याकडे आहे हे सातबारा वरून ठरत असतं. सातबारावर मात्र आपण भोगवटदार वर्ग एक आणि वर्ग दोन असे उल्लेख पाहिले असतील. आता नेमका याचा अर्थ काय? हा मोठा प्रश्न उपस्थित होतो.

तसेच भोगवटदार वर्ग दोन मधील जमिनी वर्ग एक मध्ये करता येतात का? हो तर यासाठी काय करावे लागते. असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे असतात. यामुळे आज याबाबत नेमका नियम काय आहे याविषयी आपण जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण या दोन्हींचे अर्थ समजून घेऊ.

भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी नेमक्या कोणत्या?

ज्या जमिनी संबंधित भोगवटदार व्यक्तीला विकण्याचा अधिकार नसतो अशा जमिनी या वर्गात येतात. या जमिनी प्रामुख्याने वतन स्वरूपात मिळालेल्या जमिनी असतात. म्हणजेच इनामी जमिनी आपण ज्यांना म्हणतो त्या जमिनी या वर्गात येतात. अशा जमिनी कसणाऱ्या लोकांकडे असलेल्या सातबारावर भोगवटदार वर्ग 2 असा उल्लेख असतो.

या भोगवटदार वर्ग 2 जमिनीमध्ये देवस्थान इमानी जमीन,हैद्राबाद अतियात जमिनी, वतन जमीन, वन जमीन, गायरान, पुन पुनर्वसनाच्या जमीनी व शासनाने दिलेल्या जमिनींचा समावेश होतो. या जमिनी विकण्यापूर्वी संबंधित भोगवटदाराला शासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असते. पूर्वपरवानगी न घेता अशा जमिनी जर विक्री झाल्या तर तो व्यवहार अवैध ठरवला जातो.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! 8 वी पास तरुणांना एसटी महामंडळात नोकरीची संधी; जाहिरात पहा अन आजच अर्ज करा

भोगवटदार वर्ग 1 च्या जमिनी नेमक्या कोणत्या?

या वर्गात मूळ मालकीच्या वडिलोपार्जित जमिनीचा समावेश होतो. अशा वर्गातील जमीनदार जमिनीचे मूळ मालक असतात आणि त्यांना ही जमीन कोणाच्याही परवानगी विना विक्रीचा पूर्ण अधिकार असतो. अशा जमिनी विक्रीसाठी शासनाची परवानगी आवश्यक नसते. थोडक्यात असे प्रकारचे भोगवटदार जमिनीचे स्वतः मालक असतात. 

दरम्यान, आता आपण भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करता येतात का आणि यासाठी काय प्रोसेस आहे याविषयी जाणून घेऊया. आम्ही आपणास सांगू इच्छितो की भोगवटदार वर्ग 2 जमिनी वर्ग एक करता येतात. यासाठी मात्र संबंधित व्यक्तीकडून जमिनीच्या मोबदल्यात अधिमुल्य आकारल जात. दरम्यान 2019 मध्ये या अधिमुल्यात सवलत देण्यात आली होती. आता या सवलतीला पुन्हा एकदा मुदतवाढ देखील मिळाली आहे. ८ मार्च 2024 पर्यंत ही मुदत वाढ देण्यात आली आहे. मात्र आता नव्याने काही तरतुदी किंवा नियम देखील यामध्ये लागू करण्यात आले आहेत.

या नवीन नियमानुसार किंवा तरतुदीनुसार, अधिमूल्याची रक्कम एक कोटींपेक्षा अधिक असेल, तसेच शर्थ भंग झाला असेल, तर राज्य शासनाची पूर्व मान्यता आवश्यक राहणार आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था वगळून जमीन प्रदान केल्यानंतर मूळ प्रयोजनार्थ प्रत्यक्ष वापर सुरू झाल्यानंतर पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरच वर्ग – 2 ची जमीन वर्ग -1 ची करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देता येतील.

भोगवटादार वर्ग दोनची जमीन एनए (NA) करताना 25% रक्कम भरून घेतली जाते. ती रक्कम वर्ग एक करताना अधिमूल्यातून कमी केली जात होती, यापुढे ही रक्कम वगळली जाणार नाही.

हे पण वाचा :- खुशखबर! ‘या’ 1 लाख 77 हजार शेतकऱ्यांना मिळाली राज्य शासनाकडून 629 कोटीची मदत; तुम्हाला मिळणार की नाही, पहा….

किती अधिमूल्य किंवा रक्कम भरावी लागणार

जर शेत जमिनी भोगवटदार वर्ग 2 मधील असतील तर अशा जमिनीला अधिमुल्याच्या मोबदल्यापोटी शासनाकडे रेडी रेकनरच्या 50% रक्कम भरावी लागणार आहे.

तसेच औद्योगिक, वाणिज्य कारणासाठी कब्जेहक्क, ‘भाडेपट्टयाने दिलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग 2 मध्ये असतील आणि या जमिनी भोगवटदार वर्ग 1 मध्ये समाविष्ट करायचे असतील तर यासाठी रेडिरेकनरच्या 50% अधिमूल्य.

याशिवाय, रहिवासी कारणांसाठी कब्जेहक्काने धारण केलेल्या जमिनी जर भोगवटदार वर्ग दोन मध्ये असतील आणि या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये करायच्या असतील रेडिरेकनरच्या 15% अधिमूल्य या ठिकाणी द्यावे लागणार आहे.

तसेच या सवलतीनुसार रहिवासी कारणासाठी भाडेपट्टयाने धारण केलेल्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी रेडिरेकनरच्या 25% अधिमूल्य या ठिकाणी द्यावे लागणार आहे.

आणि सहकारी गृह निर्माण संस्थांना भाडेपट्टयाने दिलेल्या व सहकारी संस्थांच्या भोगवट्यात असलेल्या जमिनी तसेच कब्जेहक्काने दिलेल्या जमिनी वर्ग दोन मधून वर्ग एक मध्ये करण्यासाठी रेडिरेकनरच्या 15% अधिमूल्य या ठिकाणी शासनाला द्यावे लागणार आहे.

हे पण वाचा :- तरुणांसाठी आनंदाची बातमी ! डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठात विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु; जाहिरात पहा

अर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतील

भोगवटदार वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यासाठी इच्छुक व्यक्तींना काही कागदपत्रांची पूर्तता देखील करावी लागते. यामध्ये जमिनीच्या मालकाचा विनंती अर्ज

प्रतिज्ञापत्र, जमिनीचे 50 वर्षांचे उतारे व खाते उतारा, 7/12 उताऱ्यावर सर्व फेरफार नोंदी, एकत्रीकरणाचा मूळ उतारा

आकारबंदाची मुळ प्रत, मुळधारकास जमिन कशा मिळाला याबाबत कबुलायत / आदेशाची नक्कल, तलाठी यांचेकडील वन जमीन नोंदवहीचा उतारा या कागदपत्रांची पूर्तता संबंधित व्यक्तींना करावी लागणार आहे. ज्या व्यक्तींकडे हे सर्व कागदपत्रे असतील ते व्यक्ती आपली भोगवटदार वर्ग 2 ची जमीन संबंधित अधिमूल्यांची रक्कम भरून वर्ग एक मध्ये रूपांतरित करू शकणार आहेत.

भोगवटदार वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठी संबंधित व्यक्तींना विहित नमुन्यातील अर्ज भरावा लागणार आहे. जर आपणास हा विहित नमुन्या मधील अर्ज पहावयाचा असेल तर आपण भोगवटदार वर्ग दोन जमिनी वर्ग एक मध्ये रूपांतरित करण्यासाठीचा नमुना अर्ज या लिंक वर क्लिक करून याची पीडीएफ डाऊनलोड करू शकता.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांनी सलग ‘इतके’ दिवस रजा घेतली तर त्यांची सेवा समाप्ती होणार ! पहा सेवासमाप्तीचा नियम