Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी; सातबारा, गाव नमुना नंबर 8 अ, जमिनीचा नकाशा अन ‘हे’ अभिलेख उतारे ऑनलाईन घरबसल्या मिळवा, कसं ते पहा….

Ahmednagar 7/12 Utara Online : अलीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शासकीय कामे जलद गतीने होऊ लागले आहेत.

Ahmednagar 7/12 Utara Online : अलीकडे माहिती तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शासकीय कामे जलद गतीने होऊ लागले आहेत. शासनाकडून सामान्य जनतेच्या सोयीसाठी आवश्यक दस्ताऐवज आता ऑनलाईन उपलब्ध करून दिले जात आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील ऑनलाइन कागदपत्रे उपलब्ध झाली आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना आता सातबारा, गाव 8अ, नमुना नंबर आठ अ, यासारखे उतारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर हे उतारे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता मुंबईमधील ‘या’ मेट्रो मार्गाचे काम होणार जलद, वाचा सविस्तर

दरम्यान आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी कशा पद्धतीने ऑनलाईन सातबारा उतारा, आठ अ, नमुना नंबर आठ अ, जमिनीचा नकाशा यांसारखे महत्त्वाचे उतारे डाऊनलोड करू शकतात याबाबत जाणून घेणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने महाभूमी पोर्टल तयार केले आहे. जिथून शेतकरी ऑनलाइन 7/12, 8 अ पाहू शकतात. शेतकरी आपले नाव, सर्वेक्षण क्रमांक, गट क्रमांक टाकून आपला उतारा पाहू शकणार आहेत.

हे पण वाचा :- नागपूरमध्ये नोकरीची संधी! एअर इंडिया एअर सर्विसेसकडून ‘या’ पदासाठी भरती जाहीर, 10वी पास उमेदवारांनाही नोकरीची संधी, थेट मुलाखतीने होणार निवड

  • यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे.
  • यानंतर वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिसणारा विभाग नाशिक निवडा.
  • जिल्हा अहमदनगर निवडा आणि GO वर क्लिक करा.
  • 7/12, 8अ, प्रॉपर्टी शीट निवडा.
  • तुमचा जिल्हा तालुका गाव निवडा.
  • यानंतर तुम्ही सर्वेक्षण क्रमांक / गट क्रमांक किंवा आपले नाव यापैकी कोणता तरी एक पर्याय सिलेक्ट करा.
  • यानंतर मोबाईल नंबर टाका आणि आपला सातबारा उतारा तुम्ही या पद्धतीने पाहू शकणार आहात.

या पद्धतीने पहा जमिनीचा नकाशा

  • सातबारा उतारा आणि इतर अभिलेख उताऱ्यांप्रमाण शेतजमिनीचा नकाशा पाहण्यासाठी, महाराष्ट्र महसूल विभागाने सुरू केलेल्या भू नकाशा https://mahabhunakasha.mahabhumi.gov.in/27/index.jsp#home-pane या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  • यानंतर वेबसाईट ओपन होईल आणि त्या ठिकाणी ड्रॉप डाऊन मेनू वर क्लिक करा.
  • जमीन नकाशा श्रेणी निवडा, म्हणजे ग्रामीण किंवा शहरी.
  • यानंतर जिल्हा, तहसील, गाव निवडा.
  • प्लॉट क्र. निवडा
  • यानंतर मॅप रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • मग शो पीडीएफ रिपोर्ट वर क्लिक करा. अशा पद्धतीने आपण आपल्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करू शकता.

हे पण वाचा :- ब्रेकिंग! स्टेट बँक ऑफ इंडियाने जाहीर केली मोठी भरती; ‘या’ लोकांना नोकरीची संधी, जाहिरात पहा