Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगरमध्ये नोकरीची संधी ! आर्मी पब्लिक स्कूलमध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, वाचा सविस्तर

Ahmednagar Army Public School Recruitment : अहमदनगरमध्ये नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये एक भरती काढण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या भरतीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण अहमदनगर येथील आर्मी पब्लिक स्कूल मध्ये कोणत्या आणि किती पदांसाठी भरती होणार आहे तसेच यासाठी कसा अर्ज करावा लागेल याबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- गुंतवणूकदार बनलेत मालामाल ! ‘हा’ शेअर ठरला मल्टिबॅगर स्टॉक, एक लाखाचे बनलेत 12 कोटी; कोणता आहे तो स्टॉक, पहा….

कोणत्या पदासाठी होणार भरती?

आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर येथे मुख्याध्यापिका आणि विशेष शिक्षक या पदासाठी भरती होणार आहे. ही 2 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

मुख्याध्यापक : या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार किमान ५०% गुणांसह कोणत्याही विषयातून पदवीधर असावा. सोबतच, सदर उमेदवाराने B.Ed/M.Ed आणि B.El.Ed/डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन घेतलेले असावे. यासह, किमान 08 वर्षांचा अध्यापनाचा अनुभवासह CBSE मान्यताप्राप्त शाळेत PRT म्हणून किमान 05 वर्षांचा अनुभव असावा. अधिक माहितीसाठी एकदा अधिसूचना वाचावी.

विशेष शिक्षक : यासाठी विशेष शिक्षणात बीएड पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहे.

हे पण वाचा :- शिंदे सरकारचा नवीन फंडा ! आता शिक्षकांची बदली होणार नाही? एकाच शाळेत तळ ठोकून बसावं लागणार; दीपक केसरकर म्हणतात…..

अर्ज कसा करावा लागणार

अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित नमुन्यामध्ये करायचा आहे. अर्जाचा नमुना www.apsahmednagar.com या संकेतस्थळावर जाऊन आपण डाउनलोड करू शकता. नमुन्यामध्ये अर्ज भरल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांसह अर्ज आर्मी पब्लिक स्कूल अहमदनगर, C/O AC सेंटर आणि स्कूल, अहमदनगर – 414002 या पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

या पदासाठी पात्र असलेल्या आणि इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज 25 मे 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवता येणार आहे. या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण https://www.apsahmednagar.com/Home/Index या अहमदनगर आर्मी पब्लिक स्कूलच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊ शकता.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! अहमदनगर, नासिकसह ‘या’ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस; वाचा डख यांचा सविस्तर अंदाज