अहमदनगर : जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी सुरू झाले शासकीय हरभरा खरेदी केंद्र, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar : राज्यात रब्बी हंगामात गहू हरभरा या पिकांची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हरभरा या पिकाची प्रामुख्याने मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. दरम्यान यंदाचा हरभरा हंगाम सुरू झाला आहे. रब्बी हंगामात पेरणी केलेल्या हरभरा बहुतांशी शेतकऱ्यांनी काढला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना मात्र काढलेला हरभरा खुल्या बाजारात विकावा लागत होता. परंतु 14 मार्चपासून शासकीय हरभरा खरेदी सुरू झाली आहे.

काही ठिकाणी उशिरा हरभरा खरेदी सुरू झाली आहे. शासकीय केंद्रावर हरभरा विक्री करण्यासाठी मात्र शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचा आवाहन केले जात आहे. 15 मार्चपर्यंत शासनाने नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्रावर हमीभावत हरभरा विक्री करण्यासाठी आवश्यक नोंदणीसाठी मुदत दिली होती.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! ‘या’ योजनेअंतर्गत कृषी स्टार्टअपसाठी मिळणार 25 लाखांचे अनुदान; ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मात्र नुकतेच शासनाने यामध्ये वाढ केली केली आहे. आता शेतकऱ्यांना 31 मार्चपर्यंत यासाठी नोंदणी करता येणार आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे खरेदी विक्री संघात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले आहे.

यामुळे राहुरी परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. खरं पाहता शासनाने हरभऱ्याला 5,335 रुपये प्रतिक्विंटल इतका हमीभाव लावून दिला आहे. मात्र खुल्या बाजारात यापेक्षा कमी बाजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून वारंवार लवकरात लवकर नाफेड च्या माध्यमातून खरेदी व्हावी अशी मागणी केली जात होती.

हे पण वाचा :- अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही…

अखेर कार शासनाने शेतकऱ्यांची ही मागणी मान्य करत हमीभावात हरभरा खरेदी सुरू केली आहे. राहुरीमध्ये हरभरा खरेदी केंद्र राहुरी तालुका सह. खरेदी विक्री संघ लि. राहुरी येथे सुरु झाले आहे. अशा परिस्थितीत परिसरातील ज्या शेतकर्‍यांना हरभरा विक्री करावयाचा आहे अशांनी आपले नाव नोंदणी करावे व स्वच्छ केलेला हरभरा विक्रीसाठी घेऊन येण्याचे आवाहन केले जात आहे. शेतकरी बांधवांनी हरभरा खरेदी केंद्रावर नावे नोंदविताना काही कागदपत्र सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा

यात आधारकार्ड, बँक पासबुक प्रत (राष्ट्रीयिकृत), सातबारा उतारा ऑनलाईन पीकपेरा, 8 अ पत्रक, मोबाईल क्रमांक यांसारखे कागदपत्रे लागणार आहेत. ज्या शेतकऱ्याला नोंदणी करावयाची आहे तो शेतकरी तिथे प्रत्यक्ष हजर राहणे देखील आवश्यक राहणार आहे. दुसऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी कोणी दुसरा शेतकरी करू शकत नाही. ज्याला विक्री करायची आहे त्यालाच नोंदणी करावी लागणार आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय…