Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळालेत 11 कोटी; संकटात सापडलेल्या बळीराजाला मिळणार दिलासा, तुम्हाला लाभ मिळाला का? पहा….

Ahmednagar District Farmer Get 11 crore : राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे.

Ahmednagar District Farmer Get 11 crore : राज्यातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. परिणामी शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय सुरू केला आहे. मात्र पशुपालन व्यवसायात देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींचा आणि आव्हानांचा सामना करावा लागत आहे. इंधन दरवाढ, पशुखाद्याच्या वाढत्या किमती, पशुच्या वाढत्या किमती, दुधाला मिळत असलेला कमी दर, वाढत्या मजुरीच्या किमती या पार्श्वभूमीवर पशुपालन हा व्यवसाय देखील आता तोट्याचा सिद्ध होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यातच पशुपालकांना जनावरांमध्ये उद्भवणाऱ्यां वेगवेगळ्या आजारांमुळे देखील मोठा फटका बसत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जनावरांमध्ये प्रामुख्याने गोवंश जनावरांमध्ये लंपी स्किन या आजाराचा शिरकाव झाला होता. या आजारामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन बाधित झाले आणि हजारोच्या संख्येने पशुधन मृत्युमुखी देखील पडले. या आजाराचा आपल्या महाराष्ट्रात फारसा शिरकाव पाहायला मिळाला नसला तरी देखील हजारोच्या संख्येने पशुधन याने बाधित झाले आणि मृत्युमुखी देखील पडले.

हे पण वाचा :- दहावी, बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर! विमानतळावर काम करण्याची सुवर्णसंधी; भारतीय विमान सेवांमध्ये ‘या’…

मात्र शासनाच्या आणि प्रशासनाच्या तत्परतेने या आजारावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या आजाराची दाहकता लक्षात घेता मात्र शिंदे फडणवीस सरकारने या आजाराने मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मोबदल्यात संबंधित पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. लंपी आजारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील हजारो पशुपालक शेतकऱ्यांचे पशुधन दगावले होते.

एका आकडेवारीनुसार चार हजार तीनशे 59 पशुधन लंपी आजारामुळे जिल्ह्यात दगावले.दरम्यान दगावलेल्या जनावरांपैकी 3984 जनावरांच्या मोबदल्यात संबंधित पशुपालकांना 11 कोटी रुपयांची मदत शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- बातमी कामाची ! ‘शेतकरी असल्याच्या दाखल्या’बाबत झाला मोठा निर्णय; वाचा सविस्तर….

विशेष म्हणजे उर्वरित पशुपालकांना देखील लवकरच नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार असल्याची माहिती संबंधितांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. एकंदरीत मार्च अखेर जिल्ह्यातील जवळपास 4000 मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या मोबदल्यात नुकसान भरपाई म्हणून संबंधीत बाधित पशुपालक शेतकऱ्यांना 11 कोटी रुपयांची मदत हस्तांतरित करण्यात आली असून उर्वरित बाधित पशुपालकांना देखील लवकरच मदत दिली जाणार आहे. संकटात सापडलेल्या पशुपालकांना यामुळे दिलासा मिळेल असा आशावाद या निमित्ताने व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ तारखेला पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार; पंजाबरावांचा अंदाज