Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून मिळणार 600 रुपयात 1 ब्रास वाळू; नगर जिल्ह्यात होणार प्रथम अंमलबजावणी, महसूलमंत्र्यांची माहिती

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील नागरिकांना म्हणजे नगरकरांना एक मोठी भेट दिली आहे.

Ahmednagar News : अहमदनगरकरांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या गृह जिल्ह्यातील नागरिकांना म्हणजे नगरकरांना एक मोठी भेट दिली आहे. विखे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यात राज्य शासनाचे वाळू धोरण लवकरच राबवले जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या धोरणानुसार अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना प्रथमच 600 रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. पाटील यांनी जिल्ह्याच्या राहाता तालुक्‍यातील सावळीविहिर येथे एका भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी याबाबत सविस्तर अशी माहिती दिली आहे. सावळी विहीर येथे 7 कोटी 78 लक्ष रूपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन महसूल विखे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले आहे.

हे पण वाचा :- मुंबई-पुणे एक्सप्रेस वे बाबत झाला मोठा निर्णय ! आता महामार्गांवर ‘या’ वाहनांना असेल बंदी, कारण काय? पहा…..

यावेळी त्यांनी सांगितले की, एक मे 2023 पासून अहमदनगर जिल्ह्यात 600 रुपयात एक ब्रास वाळू मिळणार आहे. यामुळे सहाशे रुपयात एक ब्रास वाळू वाटप करणारा अहमदनगर जिल्हा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

निश्चितच महसूलमंत्र्यांच्या गृह जिल्ह्यात या धोरणाची प्रथमच अंमलबजावणी होणार असल्याने अहमदनगरकरांमध्ये समाधानाचे वातावरण यावेळी पाहायला मिळत आहेत. निश्चितच शासनाची वाळू डेपो योजना नगर जिल्ह्यात प्रथम सुरु करण्याचा शासनाचा निर्णय संपूर्ण जिल्ह्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

हे पण वाचा :- मुंबई ते नागपूरचा प्रवास होणार आणखी जलद ! सुरु होणार नवीन सुपरफास्ट ट्रेन; केव्हा सुरु होणार, ट्रेनला कुठ राहतील थांबे, पहा……

दरम्यान यावेळी विखे पाटील यांनी सावळविहिर व परिसरातील खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनींचा प्रश्‍न एका महिन्याच्या आत सोडविणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच या शेतकऱ्यांकडून कोणतीही रेडी रेकनर आकारणी न करता वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. निश्चितच जिल्ह्यातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून जिल्ह्यातील नागरिकांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

हे पण वाचा :- पुणेकरांसाठी सोने पे सुहागा ! ‘या’ मेट्रो मार्गातील सर्वात मोठा अडसर दूर, आता 40 महिन्यांच्या आत पूर्ण होणार मेट्रो मार्गाचे काम