अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा जुना प्रयोग देतोय नवीन दिशा ; 65 वर्षीय शेतकऱ्याने देशी खपली गव्हाच्या लागवडीतून मिळवल ‘इतकं’ उत्पन्न, पहा ही यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बंधू कायमच आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून चर्चेत बनलेले असतात. दरम्यान आता जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याच्या जवखेडे खालसा येथील 65 वर्षीय तरुण शेतकरी चर्चेत आले आहेत. अलीकडे भारतीय शेतीत मोठा बदल झाला असून आता अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संकरित जातींची आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक औषधांचा, खतांचा वापर सुरु केला आहे.

मात्र जवखेडे खालसा येथील अच्युतराव वाघ व त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई वाघ या शेतकरी दांपत्याने आपली जुनीच पारंपारिक शेती नवीन प्रयोगाच्या माध्यमातून यशस्वी केली आहे. या शेतकरी धामपत्याने देसी खपली गव्हाच्या वाणातून विक्रमी उत्पादन मिळवण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे गव्हाची जातही पारंपारिक आणि सेंद्रिय पद्धतीनेचं त्यांनी ही शेती कसली.

रासायनिक खतांचा यासाठी वापर त्यांनी केला नाही. मात्र असे असूनही त्यांनी दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवलं. या शेतकरी दांपत्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी आपल्या 60 गुंठे शेत जमिनीत मोसंबीची बाग लावली. याच शेत जमिनीत त्यांनी आंतरपीक म्हणून देसी खपली गव्हाची पेरणी केली. या गव्हाच्या लागवडीतून त्यांना एकरी 16 क्विंटल एवढं उत्पादन मिळालं आहे. विशेष म्हणजे यातून 90,000 ची त्यांना कमाई झाली आहे.

यामुळे फळबाग जोपासण्यासाठी आवश्यक खर्चाची उभारणी त्यांना करता येणे शक्य झाल आहे. निश्चितच मोसंबीच्या बागेतून उत्पादन सुरू होण्याआधीच आंतर पिकातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले असल्याने आणि विशेष म्हणजे सेंद्रिय पद्धतीने शेती कसली असल्याने या शेतकरी दांपत्याचा हा प्रयोग सध्या पंचक्रोशीत चांगला चर्चेत आला आहे.

दरम्यान, प्रयोगशील शेतकरी वाघ यांनी यावर्षीही गहू लागवडीचा प्रयोग केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खपली गव्हाची त्यांनी वेळेत पेरणी केली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, गव्हाची वेळेत पेरणी 15 नोव्हेंबरपर्यंत केली जाते. वाघ यांनी मात्र पाच नोव्हेंबर रोजीचं खपली गव्हाच्या देशी वाणाची पेरणी केली आहे. गहू पेरणी करताना ट्रॅक्टरचा वापर झाला आहे. दोन ओळींमधील अंतर एक फूट आणि दोन रोपांमधील अंतर नऊ इंच याप्रमाणे गहू पेरणी झाली आहे.

गहू पेरणीसाठी हे अंतर अधिक योग्य असल्याचे जाणकार देखील नमूद करतात. या अंतरावर पेरणी केल्याने त्यांना एकरी 15 किलो एवढं बियाणं लागलं. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पेरणी पासून साधारण 135 दिवसात यापासून उत्पादन मिळणार आहे. म्हणजे साधारण 15 ते 20 मार्च दरम्यान या गव्हाची काढणी होणार आहे.

देसी बियाणं असल्याने या बियाण्याला रोग लागत नसल्याचा दावा वाघ यांनी केला आहे. यामुळे कमी उत्पादन खर्चात चांगल उत्पन्न त्यांना मिळणार आहे. निश्चितच या शेतकरी दांपत्याने शेतीमध्ये केलेला हा प्रयोग इतर नवयुवक तरुण शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक राहणार आहे.