भाऊ पैशाने पैसा वाढतो! महिन्याला 5 हजार रुपयांची एसआयपीतील गुंतवणूक बनवते तुम्हाला करोडपती; वाचा कसे आहे कॅल्क्युलेशन?

एसआयपीमध्ये जर गुंतवणूक सुरू केली आणि त्यामध्ये जर सातत्य ठेवले तर अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही काही वर्षांनी करोडो रुपयांचा निधी जमा करू शकतात.

Ajay Patil
Published:
investment tips

Investment In SIP:- पैशांची बचत ही आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आर्थिक बाब आहे व या बचतीचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करणे हे त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तुम्ही जर नुसती बचत करत असाल आणि त्याची गुंतवणूक कुठे करत नसाल तर मात्र या बचतीचा कुठल्याही पद्धतीचा फायदा तुम्हाला होत नाही.

त्यामुळे केलेल्या बचतीचे योग्य ठिकाणी गुंतवणूक करून पैशाने पैसा वाढवणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच पैसे कमावण्यासाठी पैशाला कामाला लावणे यामध्ये अभिप्रेत आहे.

गुंतवणुकीचे अनेक पर्याय सध्या उपलब्ध आहेत व त्यापैकी गेल्या काही वर्षापासून गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेला प्रकार म्हणजे म्युच्युअल फंड एसआयपी मधील गुंतवणूक हा होय.तसे पाहायला गेले तर यामधील गुंतवणुकीमध्ये थोडीफार जोखीम आहे.

परंतु तरीदेखील मोठ्या प्रमाणावर यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य दिले जात आहे. आपल्याला माहित आहे की एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडाने गुंतवणूकदारांना 12 ते 15 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे.

एसआयपीमध्ये जर गुंतवणूक सुरू केली आणि त्यामध्ये जर सातत्य ठेवले तर अगदी कमी गुंतवणुकीत तुम्ही काही वर्षांनी करोडो रुपयांचा निधी जमा करू शकतात.

यामध्ये तुमची आर्थिक आवक कशी आहे यानुसार तुम्ही एसआयपीची रक्कम ठरवू शकतात व त्याप्रमाणे दर महिन्याला सातत्यपूर्ण रीतीने गुंतवणूक करून चांगला फंड जमा करू शकतात.

या अनुषंगाने या लेखात आपण बघणार आहोत की जर तुम्ही प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी केली तर किती वर्षांनी तुमच्याकडे करोडो रुपयांची रक्कम जमा होऊ शकते.

प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी केली तर कोटी रुपयांची रक्कम जमा व्हायला किती वर्ष लागतात?
यामध्ये एखाद्या गुंतवणूकदाराने जर प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली आणि प्रत्येक वर्षाला या एसआयपीमध्ये दहा टक्क्यांनी वाढ केली तर तो गुंतवणूकदार येणाऱ्या पुढील 21 वर्षांमध्ये एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीचे रक्कम यामध्ये जमा करू शकतो.

12% वार्षिक व्याजदर पकडला तर त्यानुसार 21 वर्षात गुंतवणूकदाराला एक कोटी 16 लाख रुपयाचा परतावा मिळतो. 21 वर्षांमध्ये प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये याप्रमाणे 38 लाख 40 हजार 150 रुपये गुंतवणूकदाराला गुंतवावे लागतील.

त्या गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हा 77 लाख 96 हजार 275 रुपये असेल.असे मिळून तुम्हाला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या माध्यमातून मिळते.

तसेच तुम्ही दहा हजार रुपये जर प्रत्येक महिन्याला 16 वर्षासाठी एसआयपी मध्ये गुंतवत असाल आणि या गुंतवणुकीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी वाढ करत असाल तर तुमच्याकडे एक कोटी तीन लाख रुपयांची रक्कम अवघ्या सोळा वर्षात जमा होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe