शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCIL) च्या खाजगीकरणासाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. या बातमीनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाली आणि यामुळेच आता या कंपनीचा शेअर चांगलाच चर्चेत आहे.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCIL) ची विक्री करण्यासाठी आर्थिक बोली आमंत्रित करण्याची सरकारची योजना आहे. दोन वर्षांच्या विलंबानंतर सरकार त्याची विक्री करणार आहे. सरकारी कंपनी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही देशातील तिसरी सर्वात मोठी शिपिंग कंपनी आहे. खाजगीकरणाच्या या वृत्तानंतर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SCIL शेअर) शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. त्याचे शेअर्स सुमारे पाच टक्क्यांनी वाढले आहेत.
रॉयटर्सच्या अहवालानुसार, सरकार आता मेच्या मध्यापर्यंत SCIL खाजगीकरणासाठी आर्थिक बोली आमंत्रित करण्याचा विचार करत आहे. मात्र, सरकारने याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही.
मात्र, अंतिम निर्णय 14 एप्रिल रोजी कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. नोव्हेंबर 2019 मध्येच आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने शिपिंग कॉर्पोरेशनची विक्री करण्यास तत्वतः मान्यता दिली होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे ही प्रक्रिया पुढे जाऊ शकली नाही.
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा समभाग आज 4.94 च्या वाढीसह वरच्या सर्किटला लागला. आज या कंपनीचे शेअर्स रु.81 वर उघडले आणि रु.84.95 चा उच्चांक गाठला. त्याचा आजचा नीचांक रु.80.95 आहे. गेल्या पाच दिवसांत एससीआयएलचे शेअर्स 6.13 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 33.35 टक्क्यांनी घसरला आहे. सहा महिन्यांत 28.52 टक्क्यांची घसरण झाली असून गेल्या एका वर्षात स्टॉक 34.17 टक्क्यांनी घसरला आहे.
तथापि, गेल्या पाच वर्षांत शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा स्टॉक २२.६७ टक्क्यांनी वाढला आहे. या समभागाचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 151.40 आणि नीचांकी रु. 79.20 आहे.
स्थापना कधी झाली?
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) ची स्थापना 2 ऑक्टोबर 1961 रोजी झाली. 18 सप्टेंबर 1992 रोजी कंपनीचा दर्जा ‘प्रायव्हेट लिमिटेड’ वरून ‘पब्लिक लिमिटेड’ असा बदलण्यात आला. कंपनीला 24 फेब्रुवारी 2000 रोजी भारत सरकारने ‘मिनी रत्न’ ही पदवी प्रदान केली होती. केवळ 19 जहाजांसह एक लाइनर शिपिंग कंपनी म्हणून सुरू केलेली, आज SCI कडे DWT च्या 83 पेक्षा जास्त जहाजे आहेत. कंपनीकडे टँकर, बल्क कॅरिअर्स, लाइनर्स आणि ऑफशोअर सप्लाय उपलब्ध आहेत.