Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

राम भक्तांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेला खुले होणार अयोध्येतील भव्य राम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी माहिती

Ayodhya Ram Mandir : देश तसेच विदेशातील करोडो हिंदू, सनातनी लोकांना चाहूल लागली आहे ती रामललाच्या जन्मस्थळीत तयार होत असलेल्या भव्य राम मंदिराची. प्रभू श्री रामचंद्रजी यांचे अयोध्या येथे तयार होत असलेले भव्य राम मंदिर केव्हा पूर्ण होणार? भव्य राम मंदिरात प्रभू श्री रामजींचे दर्शन केव्हा घेता येणार? याची अगदी चातकाप्रमाणे रामभक्तांकडून वाट पाहिली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच देश, विदेशातील कोट्यावधी भक्तांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे भव्य राम मंदिराच्या उद्घाटनासंदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार अयोध्येतील राम मंदिर लवकरच देश-विदेशातील करोडो राम भक्तांसाठी खुले केले जाणार आहे.

या संदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, अयोध्येतील भव्य राम मंदिर जानेवारी महिन्यातील कोणत्याही तारखेला खुले केले जाऊ शकते.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! प्रस्तावित नागपूर-हैदराबाद वंदे भारत एक्सप्रेसला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर मिळणार थांबा, पहा…

विशेष म्हणजे या निवेदनातुन मुख्यमंत्री योगी यांनी भव्य राम मंदिराच्या ऐतिहासिक उद्घाटनासाठी देश विदेशातील तमाम राम भक्तांना आमंत्रित केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रभू श्री रामचंद्रजींच्या जन्मस्थळी सुरु असलेली विविध विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

शासनाच्या माध्यमातून अयोध्या येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांना अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक सर्व उपायोजना केल्या जात आहेत. विकासकामे करत असलेल्या विकासकांना लवकरात लवकर राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी सातत्याने भव्य राम मंदिराच्या कामाचा आढावा देखील घेत आहेत. दरम्यान, अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरात प्रभू रामललाचे अभिषेक केव्हा होईल तसेच भव्य राम मंदिर केव्हा राम भक्तांसाठी खुले होईल याची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; सिडको तब्बल 65 हजार घरांची सोडत काढणार, ‘या’ भागातील घरांचा राहणार समावेश, पहा….

मात्र यावर्षी किंवा पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच भव्य राम मंदिर खुले होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितल्याप्रमाणे भव्य राम मंदिराचे उद्धाटन यावर्षी 31 डिसेंबरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 15 जानेवारीच्या दरम्यान कोणत्याही शुभ दिवशी केले जाऊ शकते.

एकंदरीत जानेवारी 2023 पर्यंत अयोध्या येथील प्रभू श्री रामचंद्रजींचे भव्य राम मंदिर खुले होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निश्चितच राम भक्तांसाठी ही एक आनंदाची बातमी असून आता सर्व रामभक्त कोणत्या शुभप्रसंगी रामजींचे हे मंदिर दर्शनासाठी खुले होईल याकडे लक्ष ठेवून आहेत.

हे पण वाचा :- मुंबईहुन ‘या’ शहरादरम्यान सुरु होणार वंदे भारत एक्सप्रेस ! उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा होणार यशस्वी