New Bank Locker Rate:- बरेच व्यक्ती हे सोने किंवा चांदी सारख्या महागड्या किंवा मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी बँक लॉकरचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. बँक लॉकरच्या सुविधा ही जवळपास देशातील प्रत्येक बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना देण्यात येते.
आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण बँकेच्या लॉकरचा वापर काही मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी करतो तेव्हा बँकेकडून याकरिता वार्षिक शुल्क आकारले जाते यामध्ये बँकांचे दर वेगवेगळे असू शकतात. अशाप्रकारे वार्षिक शुल्क देऊन तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवून सुरक्षित ठेवू शकतात.
परंतु आता बँक लॉकरचे संबंधित असलेले काही नियम बदलण्यात आले असून हे बदललेले नियम स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक आणि पंजाब नॅशनल बँक यासारख्या देशातील महत्त्वाच्या बँकांमध्ये लागू केले जाणार आहेत.
या बँका वार्षिक भाड्याच्या आधारावर लॉकरची सेवा ग्राहकांना पुरवतात. या अनुषंगाने आता या बँकांनी नवीन दर जाहीर केले आहेत व ते आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे.
बँक लॉकरसाठी लागू केले नवीन दर
स्टेट बँक ऑफ इंडियाने लॉकरचे नवीन दर जाहीर केले असून पुढील प्रमाणे आहेत.
लहान लॉकर करिता- दोन हजार रुपये( मेट्रो/ शहरी) आणि 1500 रुपये( सेमी अर्बन/ ग्रामीण भाग)
मध्यम लॉकरकरिता- चार हजार रुपये (मेट्रो/शहरी) आणि तीन हजार रुपये (सेमी अर्बन/ग्रामीण)
मोठे लॉकर करिता- मेट्रो भागाकरिता आठ हजार रुपये आणि ग्रामीण किंवा सेमी अर्बन भागाकरिता सहा हजार रुपये
अतिरिक्त मोठे लॉकर– मेट्रो किंवा शहरी भागाकरिता 12 हजार रुपये तर सेमी अर्बन किंवा ग्रामीण भागासाठी 9000 रुपये
2- आयसीआयसीआय बँक- आयसीआयसीआय बँकेने देखील बँक लॉकरचे नवीन दर लागू केले आहेत व ते पुढीलप्रमाणे….
ग्रामीण भाग- एक हजार दोनशे रुपये ते दहा हजार रुपये
निमशहरी क्षेत्र- दोन हजार रुपये ते 15 हजार रुपये
शहरी भाग- तीन हजार ते 16 हजार रुपये
मेट्रो शहर- साडेतीन हजार ते वीस हजार रुपये
3- एचडीएफसी बँक- देशातील महत्त्वाच्या असलेल्या एचडीएफसी बँकेने देखील बँक लॉकरसाठी नवीन दर लागू केलेले आहेत व ते पुढील प्रमाणे…
मेट्रो शहर- 1350 रुपये ते 20 हजार रुपये
शहरी भागाकरिता- एक हजार शंभर रुपये ते पंधरा हजार रुपये
निमशहरी भाग- 1100 ते 11 हजार रुपये
ग्रामीण भागाकरिता- 550 रुपये ते 9 हजार रुपये
4- पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी बँक- पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून देखील बँक लॉकरचे नवीन दर जाहीर करण्यात आलेले असून ते पुढील प्रमाणे आहेत…
ग्रामीण भागाकरिता- 1250 रुपये ते दहा हजार रुपये
शहरी भागाकरिता– दोन हजार रुपये ते दहा हजार रुपये