Bank Of Baroda Car Loan : तुमचेही नवीन कार खरेदी करण्याचे स्वप्न आहे का ? मग तुमच्यासाठी आजची ही बातमी कामाची ठरणार आहे. सणासुदीच्या काळात ज्या लोकांना नवीन गाडी खरेदी करायची असेल आणि कार खरेदी करण्यासाठी कर्ज घेण्याच्या तयारीत असतील अशा लोकांसाठी ही बातमी खास ठरणार आहे. कारण की, आज आपण देशातील दोन प्रमुख सरकारी बँकांपैकी कोणती बँक कमी व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणती बँक कमी व्याज दरात कार लोन देते
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तुलनेत बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना कमी व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहे. एसबीआय वार्षिक 9.15 टक्के दराने आणि बँक ऑफ बडोदा 9% दराने कार लोन उपलब्ध करून देते. मात्र हे बँकेचे किमान व्याजदर आहे.
जर ग्राहकांना या किमान व्याजदराचा फायदा घ्यायचा असेल स्वस्तात कार लोन घ्यायचे असेल तर त्यांचा सिबिल स्कोर किमान 800 च्या आसपास असायला हवा. या आधारावर जर तुम्ही बँक ऑफ बडोदा कडून आठ लाख रुपयांचे कार लोन 5 वर्षांसाठी घेतले तर 16,607 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
म्हणजेच या कालावधीत सदर ग्राहकाला 9 लाख 96 हजार 420 रुपये द्यावे लागणार आहेत. अर्थातच एक लाख 96 हजार 420 रुपये व्याज म्हणून भरावे लागणार आहेत. पण, यामध्ये प्रोसेसिंग चार्जेस आणि इतर चार्जेस समाविष्ट नाहीयेत.
म्हणून याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही बँकेकडून मिळवणे अपेक्षित आहे. जर समजा एसबीआय बँकेकडून पाच वर्षे कालावधीसाठी आठ लाख रुपयांचे कार लोन घेतले तर सदर ग्राहकाला 16665 रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार आहे.
सदर ग्राहकाला 9 लाख 99 हजार 900 रुपये भरावे लागतील, म्हणजेच एक लाख 99 हजार 900 रुपये व्याज द्यावे लागणार आहे. व्याजाची रक्कम पाहता एसबीआय बँकेपेक्षा बँक ऑफ बडोदा कडून कार लोन घेणे ग्राहकांसाठी परवडणारे ठरणार आहे.