कर्ज घेण्याच्या तयारीत आहात ना ! मग कर्ज घेण्यापूर्वी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Banking Loan : आजची ही बातमी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष खास राहणार आहे. जर तुम्ही ही कर्ज घेण्याचा तयारीत असाल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा. खरं पाहता, आपण आपल्या व आपल्या परिवाराच्या गरजा भागवण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढतो. मात्र अनेकदा या कर्जामुळे व्यक्तीच्या संपत्तीत घट येते. यामुळे कर्ज काढताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.

खरं पाहता कर्ज दोन प्रकारची असतात ती म्हणजे काही कर्ज आपली संपत्ती वाढवतात तर काही कर्ज आपली संपत्ती कमी करतात. यानुसार जी कर्ज आपली संपत्ती वाढवतात त्यांना आपण गुड लोन म्हणू शकतो आणि जी कर्ज आपली संपत्ती कमी करतात त्यांना आपण बॅड लोन म्हणू शकतो.

आता तुम्ही म्हणाल गुड लोन कर्ज कस काय संपत्ती वाढवते. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जे कर्ज आपण काहीतरी मालमत्ता किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी काढतो त्या कर्जापोटी आपली संपत्ती ऑटोमॅटिक वाढत असते. निश्चितच या ठिकाणी व्याज द्यावे लागते मात्र यामुळे आपली संपत्ती किंवा मालमत्ता वाढत असल्याने हे कर्ज अनेकदा फायदेशीर ठरते.

मात्र काही प्रसंगी असं देखील कर्ज हे त्रासदायक ठरू शकते. दरम्यान गुड लोन कॅटेगिरी मध्ये जें कर्ज आपण घेतो यामध्ये व्यावसायिक कर्ज, गृह कर्ज आणि शैक्षणिक कर्जाचा समावेश होतो. व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज आपल्याला नवीन इन्कम मिळवून देत, शिक्षणासाठी घेतलेल कर्ज आपल्या करिअरसाठी आवश्यक असतं आणि यामुळे भविष्यात आपल्याला इन्कम मिळणार आहे, तर गृह कर्ज अर्थातच घरासाठी घेतलेलं कर्ज यामुळे आपल्याला घर मिळतं जी की एक मालमत्ताच आहे.

अर्थातच गुड लोन कॅटेगिरी मधील कर्जामुळे आपल्या संपत्तीत किंवा करिअरमध्ये चांगली ग्रोथ होते. या कर्जामुळे वेळेनुसार आपल्या संपत्तीत वाढ होते. या कर्जामुळे आपल्याला जो परतावा मिळतो तो परतावा हा व्याजापेक्षा अधिक असू शकतो.

बॅड लोन म्हणजे काय?

आता आपण बॅड लोन समजून घेऊया. बॅड लोन कर्जामध्ये वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड वरील कर्ज, एखादी महागडी वस्तू खरेदी करण्यासाठी घेतलेलं कर्ज याचा समावेश केला जाऊ शकतो. खरं पाहता ही देखील मानवाची गरजच आहे. मात्र या गोष्टींसाठी घेतलेल्या कर्जामुळे माणसाच्या संपत्तीत वाढ होत नाही तर संपत्ती कमी होऊ शकते.

या कर्जांसाठी व्याजापोटी जी रक्कम जाते ती परताव्यापेक्षा अधिक असते. वास्तविक या अशा कर्जामुळे परतावा मिळतच नाही. शिवाय या कर्जासाठी जे काही हिडन चार्जेस असतात ते देखील अधिक असतात. त्यामुळे अशा गोष्टींसाठी कर्ज घेण्यापूर्वी आपल्याकडे पैशांसाठी दुसरा काही सोर्स उपलब्ध आहे का याची आधी चाचपणी करावी.

यामुळे आपल्याला आवश्यक असलेल्या आणि गरजेच्या गोष्टीसाठी कर्ज घेणे पसंत करा. कारण की कर्ज ही एक उधारी आहे जी आपल्याला व्याजासकट परत करावी लागते. यामुळे गुड लोन कॅटेगिरी मधील कर्ज तुमची संपत्ती वाढवते तर बॅड लोन कॅटेगरी मधील कर्ज तुमची संपत्ती कमी करू शकते.