Best Water Geyser: ऑफ सीजनमध्ये खरेदी करा भारतातील ‘हे’ टॉप गिझर ब्रँड! कमी विजेच्या वापरात मिनिटात गरम होईल पाणी; वाचा किंमत

सध्या बाजारात आणि ऑनलाईन अनेक वाटर हीटर्स उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी असे गिझर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्यातले पाणी गरम करण्याची क्षमता तसेच होणारा विजेचा वापर  आणि पाणी गरम करण्यासाठी लागणारा वेळ इत्यादी बाबींचा विचार करून वॉटर गिझर विकत घेणे किंवा खरेदी करण्यासाठी निवड करणे गरजेचे असते.

Ajay Patil
Published:

Best Water Geyser:- येणाऱ्या काही दिवसात आता हिवाळा सुरू होईल व हिवाळ्यात गरम पाण्यासाठी गिझर अतिशय उपयुक्त ठरते. थंडीत मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करून कामाला सुरुवात करणे यामध्ये खूप वेगळ्या प्रकारची मजा असते. त्यामुळे पटकन आणि कमीत कमी विजेच्या वापरात पाणी गरम करतील असे गिझर खरेदी करणे या कालावधीत खूप महत्त्वाचे आहे.

सध्या बाजारात आणि ऑनलाईन अनेक वाटर हीटर्स उपलब्ध आहेत. परंतु त्यापैकी असे गिझर खरेदी करण्यापूर्वी त्यांच्यातले पाणी गरम करण्याची क्षमता तसेच होणारा विजेचा वापर  आणि पाणी गरम करण्यासाठी लागणारा वेळ इत्यादी बाबींचा विचार करून वॉटर गिझर विकत घेणे किंवा खरेदी करण्यासाठी निवड करणे गरजेचे असते.

त्यामुळे या लेखामध्ये आपण काही उत्कृष्ट असे काही गिझर ब्रँड विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत. जे तुम्हाला वॉटर गिझर्स खरेदी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

 स्वस्तात मस्त असलेले भारतातील उत्कृष्ट असे गिझर ब्रांड

1- रेकोल्ड वॉटर हीटर 25L- रेकोल्ड गिझर विशेष करून टायटॅनियम प्लस टेक्नॉलॉजीच्या मदतीने तयार करण्यात आला असून यामध्ये टायटॅनियम स्टीलचा टॅंक देण्यात आलेला आहे व यामुळे दाब आणि पाण्याची अशुद्धता असेल तरी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिकार करण्यास मदत करते. यामध्ये एक उत्कृष्ट असे विशेष डिफ्लेक्टर वापरण्यात आले आहे जे थंड आणि गरम पाणी मिसळण्यास मदत करते आणि पाणी जास्त कालावधी करिता गरम ठेवते.

पाणी पुन्हा पुन्हा गरम करण्याची गरज भासत नाही. यामध्ये असलेल्या स्मार्ट बाथ लॉजिक तंत्रज्ञानामुळे हे वॉटर गिझर  तुम्हाला बकेट बाथ, शॉवर बाथ इत्यादी पर्याय निवडू देते व 30 टक्के पर्यंत विजेची बचत देखील करू शकते. हे गिझर 25 लिटर वॉटर क्षमतेचे असून ते सुरक्षिततेसाठी तीन स्तरासह येते व याची किंमत जर बघितली तर ती 8998 रुपये इतकी आहे.

2- हॅवेल्स दहा लिटर स्टोरेज वाटर हीटर हॅवेल्स ब्रँडचे हे वॉटर हिटर घरासाठी खूप चांगले उत्पादन असून त्यामध्ये वापरण्यात आलेल्या प्रगत तंत्रज्ञानाने या गिझरला ग्राहकांनी 4.4 स्टार रेटिंग दिले आहे. या गीझरमध्ये तापमान सेट करण्यासाठी एक नॉब आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही पाणी कमी अधिक प्रमाणात गरम करू शकता.

तसेच या हिटरच्या टाकीवर सात वर्षाची वारंटी देखील देण्यात आलेली आहे. वॉटर गिझर अल्ट्राटेक सुपर कोल्ड रोल्ड स्टील प्लेट पासून बनवलेले आहे व ते मानक अंतर्गत टाकीच्या डिझाइनच्या तुलनेत गंजला उच्च प्रतिकार देते व त्यामुळे त्याचे आयुष्य दीर्घ कालावधीसाठी वाढते.

तसेच हे भारतातील पहिले इंटिग्रेटेड शॉक सेफ प्लग वॉटर हिटर असून यामध्ये विद्युत गळती झाल्यास वीज खंडित करून आपले इलेक्ट्रिक शॉक लागण्यापासून संरक्षण करते. हॅवेल्स वॉटर गिझरची किंमत 9999 रुपये इतकी आहे.

3- क्रॉम्प्टन अमिका प्रो 25-L वॉटर हिटर क्रॉम्प्टन वॉटर हिटर हे 25 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसह एक शक्तिशाली आणि कार्यक्षम असा ऊर्जा पर्याय असलेले वाटर हीटर असून हे क्रॉम्प्टन सुपिरिअर ग्लास लाईन कोटिंग सहित येते व कठोर म्हणजेच क्षारयुक्त पाण्यात देखील हे चांगले काम करते.

यामध्ये वापरण्यात आलेल्या मल्टी फंक्शन व्हाल्व आणि सिंगल वेल्डेड टाकीच्या वापराने हा सर्वात बार पर्यंतचा दाब सहन करू शकतो. ज्यामुळे ते उंच इमारतीसाठी वापरास योग्य बनते.

यात तीन लेव्हल सेफ्टी असून ज्यात हाय प्रिसिजन कॅपिलरी थर्मोस्टॅट, ऑटोमॅटिक थर्मल कट आउट आणि इलेक्ट्रिक शॉक व अति उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी मल्टीपर्पज व्हॉल्व देण्यात आले आहेत. मात्र हा गिझर चालू असताना विजेची फारशी बचत होत नाही. या गिझरची किंमत 7999 रुपये आहे.

4- हायर प्रेसिस प्रो 15-L स्टार वाटर हीटर हायरचा हा गिझर पाच स्टार बीईई रेटिंग सह येतो. जे वापरल्यावर जास्त विजेचा वापर होत नाही व वीजबिलात फार मोठी बचत होते.हे वॉटर हीटर त्याच्या पेटंट शॉक प्रूफ तंत्रज्ञानासह अनेक पद्धतीने व्यक्तीची विजेच्या शॉक पासून संरक्षण करते व त्याच्या पीआर हॉल्व जास्त दाब सोडतो आणि टीटीएस तंत्रज्ञान या वाटर हीटरला जास्त गरम होण्यापासून वाचवते.

एपीएस बॉडीचा बनवलेला हा सर्वात उच्च कार्यक्षमतेचा गिझर ब्रँड सहजपणे खराब होत नाही व वापरासाठी दीर्घ कालावधीपर्यंत टिकतो. याची 15 लिटरची पाण्याची टाकी असल्यामुळे तीन ते चार लोकांच्या कुटुंबासाठी हे वॉटर गिझर खूप योग्य आहे.

यामध्ये असलेली अल्ट्रा मायक्रो कोटेड टाकी, स्पेशल स्टील शीट आणि टायटॅनियम कोटिंग खूप चांगली कामगिरी देते. हायर गिझर ची किंमत सहा हजार 989 रुपये इतकी आहे.

5- पॉलीकॅब सुपरिया पाच स्टार वॉटर गिझर या गिझरमध्ये गरम पाण्याकरिता 25 लिटरची पाण्याची टाकी देण्यात आली असून सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हे वॉटर गिझर गंज रोधक तंत्रज्ञानासह येते व यामुळे याच्या टाकीचे आयुष्य वाढते.

तसेच टाकी सोबत पाच वर्षाची वारंटी दिली जाते. याच्या उच्च उर्जा बचत रेटिंगमुळे हे वाटर गिझर जास्त वीज वापरत नाही व त्यामुळे वीज बिलात खूप मोठी बचत होते.

या गिझरमध्ये तापमान नियंत्रित करण्यासाठी एक नॉब आहे व या नॉबच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी गरम किंवा जास्त गरम पाणी सेट करू शकतात. यामध्ये उच्च कार्यक्षम हिटिंग घटक वापरण्यात आलेले आहेत व त्यामुळे पटकन गरम पाणी देण्यासाठी हे सक्षम आहे. पॉलीकॅब वॉटर गिझरची किंमत 7599 रुपये इतकी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe