Budget hatchback car In India:- सध्या ज्याप्रमाणे भारतीय ग्राहकांमध्ये एसयूव्ही सेगमेंट मधील कारची मागणी वाढताना दिसून येत आहे.अगदी त्याच पद्धतीने हॅचबॅक कारला देखील प्रचंड मागणी वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला देखील येणाऱ्या कालावधीमध्ये नवीन हॅचबॅक कार विकत घ्यायची असेल तर या लेखामध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.
जर आपण भारतातील सर्वात महत्त्वाच्या कार विक्री करणाऱ्या कंपन्या पहिल्या तर यामध्ये मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि टोयोटा किर्लोस्कर पर्यंत अशा अनेक कंपन्यांचे नावे घेता येतील.
या कंपन्या भारतीय कार बाजारपेठेमध्ये त्यांचे अनेक हॅचबॅक कार मॉडेल्स विकतात व महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांकडून देखील या हॅचबॅक कारला उत्कृष्ट प्रतिसाद मिळताना दिसून येतो. या लेखामध्ये आपण अशाच पाच कारची माहिती बघणार आहोत. ज्या अनेक आकर्षक वैशिष्ट्य आणि कमी किमतीत मिळतात.
या आहे दहा लाख रुपयेपेक्षा कमी किमतीतल्या उत्कृष्ट हॅचबॅक कार
1- मारुती सुझुकी बलेनो- जर तुम्हाला नवीन हॅचबॅक कार विकत घ्यायची असेल तर तुम्ही मारुती सुझुकी बलेनोचा विचार करू शकता. मारुती सुझुकीने ही कार 2015 मध्ये भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली होती. या कारमध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून जे 88 bhp ची कमाल पावर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
विशेष म्हणजे या कारमध्ये सीएनजीचा पर्याय देखील मिळतो. भारतीय बाजारात मारुती सुझुकी बलेनोची एक्स शोरूम किंमत सहा लाख 66 हजार पासून ते नऊ लाख 83 हजार रुपयांपर्यंत आहे.
2- टोयोटा ग्लान्झा- टोयोटा ग्लान्झा ही कार देखील भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय असलेली हॅचबॅक कार आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत टॉप मॉडेल साठी सहा लाख 86 हजार रुपये ते दहा लाख रुपये पर्यंत आहे.
या कारमध्ये 1.2- लिटर चार सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तसेच या कारमध्ये सीएनजी पावरट्रेनचा पर्याय देखील मिळतो.
3- मारुती सुझुकी स्विफ्ट- भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी स्विफ्ट सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या हॅचबॅक कार पैकी एक आहे. भारतीय बाजारामध्ये या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 49 हजार ते नऊ लाख 60 हजार रुपये पर्यंत आहे. कंपनीने या कारमध्ये 1.2- लिटर झेड सिरीज पेट्रोल इंजिन दिले असून जे 81 बीएचपीची कमाल पावर आणि 112 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
4- टाटा अल्ट्रोझ- नवीन हॅचबॅक कार विकत घेणाऱ्यांसाठी टाटा अल्ट्रोझ हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. भारतीय बाजारामध्ये या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत टॉप मॉडेलकरिता सहा लाख 50 हजार ते दहा लाख 85 हजार रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन, 1.2- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5- लिटर डिझेल इंजिन पर्याय देण्यात आला आहे.
5- ह्युंदाई i20- ही कार भारतीय ग्राहकांमध्ये नेहमीच लोकप्रिय राहिलेली आहे. भारतीय बाजारामध्ये ह्युंदाई i20 ची एक्स शोरूम किंमत सात लाख चार हजार ते अकरा लाख 21 हजार रुपये पर्यंत आहे. कंपनीने या कारमध्ये 1.2- लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.2- लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे.