Business Idea: मार्केटचा अभ्यास आणि भांडवल असेल तर ‘हा’ व्यवसाय लाइफटाइम देईल लाखात नफा, वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea:-  कुठलाही व्यवसाय सुरू करताना सगळ्यात अगोदर त्या व्यवसायाची माहिती, त्या व्यवसायाच्या बाजारपेठेचा अभ्यास, भविष्यातील संधी, लागणारी गुंतवणूक आणि त्या व्यवसायातून मिळणारा नफा इत्यादी गोष्टींचा अभ्यास हा खूप महत्वपूर्ण ठरतो. व्यक्तीचा विचार केला तर अन्न, वस्त्र आणि निवारा त्याच्या मूलभूत गरजा आहेत. त्यामुळे फूड इंडस्ट्रीज आणि क्लोथ इंडस्ट्रीज यांना भारतामध्ये खूप चांगल्या संधी आहेत.

यापैकी क्लोथ अर्थात कपड्यांच्या व्यवसायाच्या संबंधित विचार केला तर बाजारपेठेचा अभ्यास आणि भांडवल राहिले तर या क्षेत्रामध्ये चांगला जम बसवता येणे शक्य आहे. त्यामुळे या लेखामध्ये आपण कपड्यांच्या व्यवसायाच्या संबंधित  आणि नवीन पिढीच्या आवडत्या अशा जीन्स पॅन्ट तयार करण्याच्या व्यवसायाबद्दल बरीच माहिती पाहणार आहोत.

 जीन्स पॅन्ट बनवण्याचा व्यवसाय देईल लाखात नफा

आपल्याला माहित आहेस की, संपूर्ण जगामध्ये जीन्स पॅन्ट प्रसिद्ध असून अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत तसेच मुली देखील आता जीन्स पॅन्ट घालतात. तसेच कुठल्याही ऋतूमध्ये  जीन्स पॅन्ट घालणे शक्य आहे. त्यामुळे जीन्स पॅन्टची मागणी कायम बाजारपेठेत असते. बाजारपेठेमध्ये अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या जीन्स  उपलब्ध आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जीन्स मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर हा एक चांगल्या कमाईचा मार्ग होऊ शकतो.

 हा व्यवसाय कसा सुरु करावा?

याकरिता तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाचा एक परफेक्ट प्लॅन असणे गरजेचे आहे. सुरुवातीला तुम्ही किती गुंतवणूक करू शकता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाकरिता लागणारा कच्चामाल तुम्ही कुठून खरेदी करणार आहात आणि या व्यवसायाचे मार्केटिंग तुम्ही कशा पद्धतीने करणार आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला यातून किती नफ्याची अपेक्षा आहे या व इतर अनेक महत्त्वाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात.

 या व्यवसायासाठी आवश्यक बाबी

1- जागेची आवश्यकता जर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर या व्यवसायाची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला याकरिता जास्त जागेची आवश्यकता भासेल. याकरिता लागणारे यंत्रसामग्री  करिता जागेची आवश्यकता भासते. याशिवाय तुम्हाला गोडाऊन करिता देखील जागा लागेल. त्यामुळे जागेची उपलब्धता सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. जागेची निवड करताना त्या ठिकाणाहून बाजारपेठेपर्यंत वाहतुकीच्या सोयी चांगल्या असणे देखील गरजेचे आहे.

2- या व्यवसाय करता लागणारे आवश्यक रजिस्ट्रेशन आणि परवाने या व्यवसाय करता तुम्हाला काही प्रकारचे परवाने घेण्याची आवश्यकता असते. जीन्स मॅन्युफॅक्चरिंग युनिट अर्थात जिन्स बनवण्याच्या व्यवसायाकरिता तुम्हाला जीएसटी नंबर, बिझनेस लायसन, प्रदूषण मंडळाकडून एनओसी, एस एस आय युनिट रजिस्ट्रेशन आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एमएसएमइ रजिस्ट्रेशन आवश्यक असते.

तसेच तुम्हाला या व्यवसायात स्वतःचा ब्रँड मार्केटमध्ये आणायचा असेल तर तुम्ही ट्रेडमार्क लायसन्स देखील घेणे गरजेचे आहे. या प्रकारचे सगळे रजिस्ट्रेशन आणि परवाने मिळवल्यानंतर तुम्ही या व्यवसायाची सुरुवात सोप्या पद्धतीने करू शकतात.

3- लागणारा कच्चामाल आणि यंत्रसामग्री प्रत्येक व्यवसायाप्रमाणे या व्यवसायात देखील कच्च्या मालाची गरज भासते. या व्यवसायाकरिता लागणारा कच्चामाल आणि यंत्रसामग्री खरेदी करण्याकरता  तुम्ही या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली लागणाऱ्या बाबी खरेदी करू शकतात.

याकरिता प्रामुख्याने जीन्स बनवण्यासाठी लागणारा कापड, आवश्यक धागे, स्टिकर, लेबल,रंग, सुती कपडे, चीप आणि बटणे इत्यादी साहित्ये लागते. तसेच यंत्रसामग्रीचा विचार केला तर या व्यवसायामध्ये तुम्हाला लॅपिंग ट्रॉली, प्रिंटिंग मशीन, स्टिचिंग मशीन, स्टेन रिमूविंग मशीन, वाशिंग मशीन, कटिंग मशीन आणि ओव्हरलुक मशीन इत्यादी यंत्रसामग्री लागते. यंत्रसामग्री खरेदी करताना दर्जेदार असणे गरजेचे असून जेणेकरून ती जास्त काळापर्यंत चालू शकेल.

4- व्यवसायाची माहिती घेणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या व्यवसायाबद्दल तुम्ही अगोदर सगळी माहिती घेणे गरजेचे आहे. तुम्हाला स्वतःला जीन्स कशा पद्धतीने बनवली जाते याबद्दल सखोल ज्ञान मिळवणे गरजेचे असून त्यासोबतच या क्षेत्रातले पारंगत कर्मचाऱ्यांची निवड देखील तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. कपडे शिवणाऱ्या टेलर कर्मचाऱ्यांच्या करता तुमच्या मदतीला येऊ शकतात. कर्मचारींपेक्षा तुम्ही या क्षेत्रामध्ये पारंगत असणे गरजेचे आहे. कर्मचाऱ्यांच्या विश्वासावर सगळ्या गोष्टी सोडून देणे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून योग्य नाही.

5- मार्केटिंग महत्त्वाची जीन्स बनवण्याच्या तुमच्या या व्यवसायाचे मार्केटिंग चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे असून याकरिता तुम्ही तुमच्या शहरातील आणि आजूबाजूच्या कपड्यांच्या दुकानांशी संपर्क करू शकतात. तसेच याकरिता तुम्ही ऑनलाईन मार्केटिंग चा आधार घेऊ शकतात. त्याकरता तुम्हाला ऑनलाईन विक्रेता होणे गरजेचे आहे. दुसरे महत्त्वाचे म्हणजे या करता तुम्ही स्वतःची वेबसाईट तयार करून लोकांपर्यंत तुमचे उत्पादन पोहोचू शकतात.

6- या व्यवसायात लागणारी गुंतवणूक सुरुवातीला हा व्यवसाय तुम्ही छोट्या स्वरूपात सुरू करणे गरजेचे असून त्यानंतर व्यवसाय चांगला सुरू झाल्यानंतर तुम्ही यात हळूहळू वाढ करू शकतात. या व्यवसायासाठी प्रामुख्याने सगळा खर्च हा आठ ते दहा लाख रुपये पर्यंत लागू शकतो.

7- नफ्याचे स्वरूप जीन्स पॅन्ट ला मागणी ही कायमच असते. परंतु व्यवसाय मधून चांगला नफा मिळवण्याकरिता याची मार्केटिंग उत्तम असणे गरजेचे आहे. साधारणपणे नफ्याचा विचार केला तर या व्यवसायातून एका महिन्यात लावलेल्या गुंतवणुकीच्या 30% पर्यंत नका या व्यवसायातून मिळू शकतो. यामध्ये परिस्थितीनुसार थोडंस कमी जास्त होऊ शकते. जास्त विक्री वाढवण्यासाठी तुम्ही ई कॉमर्स साईटचा आधार घेऊ शकतात. तसेच या व्यवसायातील रिटेलरं सोबत तुम्ही चांगले संबंध ठेवून तुमची विक्री वाढवू शकतात.

8- महत्वाच्या गोष्टी यामध्ये तुम्ही बनवत असलेल्या जीन्स ची क्वालिटी दर्जेदार असणे खूप गरजेचे आहे. बाजारपेठेचा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कारण लोकांना कशा पद्धतीची जीन्स हवे आहेत किंवा डिझाईन इत्यादी बद्दल अभ्यास ठेवणे खूप गरजेचे आहे. एकंदरीत लोकांचा ट्रेंड कसा आहे त्यानुसारच तुम्ही तुमचे उत्पादनात बदल करणे गरजेचे आहे. तसेच व्यवसायाची सुरुवात झाल्यानंतर त्याचा प्रसार करणे तेवढेच गरजेचे आहे. अगोदर छोट्या रूपात सुरुवात करून नंतर हळूहळू त्याच्यात वाढ करणे गरजेचे आहे.