Business Idea: सीएनजी पंप सुरू करा आणि बक्कळ पैसा कमवा, वाचा गुंतवणूक आणि यासंबंधीची महत्त्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Idea:-  पेट्रोल आणि डिझेल यांना पर्याय म्हणून आता मोठ्या संख्येने सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनाचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या कालावधीमध्ये सीएनजी गॅस पंप जर सुरू केला तर त्या माध्यमातून निश्चितच चांगल्या पद्धतीची कमाई करता येणे शक्य आहे. या व्यवसायाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इंधनाच्या संबंधित कोणता जरी व्यवसाय सुरू केला तर तो अत्यंत फायदेशीर आणि  कमीत कमी जोखमीच्या कक्षेत येतो.

सीएनजी गॅस पंप सुरू करायचा असेल तर याकरिता गॅस कंपन्यांच्या काही महत्त्वाच्या अटी असतात. त्या पूर्ण करून तुम्हाला तीस ते पन्नास लाख रुपये गुंतवणुकीमध्ये सीएनजी पंप सुरू करता येतो. या अनुषंगाने या लेखामध्ये आपण सीएनजी पंप कसा सुरू करायचा? त्याबद्दल महत्त्वाची माहिती घेऊ.

 अशा पद्धतीने उघडू शकतात सीएनजी गॅस पंप

तुम्हाला जर सीएनजी गॅस पंप सुरू करायचा असेल तर त्याकरिता एखाद्या या क्षेत्रातील कंपनीकडून तुम्हाला सीएनजी पंप डीलरशिप घेणे गरजेचे असते. जर तुमच्याकडे जमीन असेल तर तुम्ही सीएनजी पंप अंतर्गत अर्ज करू शकता तो सहजपणे याची डीलरशिप देखील मिळू शकतात.

परंतु सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुमच्याकडे पैसा असणे गरजेचे आहे. जर आपण भारताचा विचार केला तर भारतात सीएनजी गॅस पंपच्या डीलरशिप देणाऱ्या अनेक प्रकारच्या कंपन्या अस्तित्वात आहे. या गॅस पंपाचा परवाना मिळवण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करणे गरजेचे असते व त्यानंतरच तुम्ही डीलरशिप मिळवून संबंधित कंपनीच्या माध्यमातून सीएनजी पंप सुरू करू शकतात.

सीएनजी गॅस पंप नेमका कोणत्या ठिकाणी उघडायचा आहे याची संबंधित माहिती कंपन्या या जाहिरातीच्या किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून देतात. या जाहिरातीमध्ये जे ठिकाण दिलेले आहे त्या ठिकाणी जर तुमची जमीन असेल तर तुम्ही त्यासाठी अर्ज करू शकतात. याकरिता कंपन्यांच्या वेबसाईट तुम्हाला अर्ज करण्यासाठी उत्तम मार्ग आहे. सीएनजी पंप उघडण्याकरिता तुमच्याकडे तीस ते पन्नास लाख रुपयांचे भांडवल असणे गरजेचे आहे.

 या कंपन्या देतात सीएनजी पंप डीलरशिप

भारताचा विचार केला तर भारतामध्ये सीएनजी गॅस पंपाचा डीलरशिप देणारे अनेक कंपन्या असून त्यामध्ये महत्त्वाच्या म्हणजे गेल इंडिया लिमिटेड, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, इंदिरा ब्राईट पेट्रोलियम प्रायव्हेट लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड  या भारतातील महत्त्वाच्या सीएनजी गॅस पंपाची डीलरशिप देणाऱ्या कंपन्या आहेत.

 एवढा खर्च करावा लागेल

सीएनजी पंप उघडण्यासाठी खूप जास्त प्रमाणात खर्च येतो. यामध्ये तुमचे जमीन नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे यावर देखील बऱ्याच बाबी अवलंबून असतात. शहराच्या जवळ जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पैसे खर्च करणे गरजेचे असते. एखाद्या महामार्गावर आणि शहरापासून दूर जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला तीस ते पन्नास लाख रुपये खर्च करणे गरजेचे आहे. समजा तुमच्याकडे जमीन नसेल आणि तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही भाड्याच्या जमिनीवर देखील हा व्यवसाय सुरू करू शकतात. साधारणपणे कमीत कमी 30 लाख आणि जास्तीत जास्त एक कोटी रुपये यासाठी खर्च आहे.

 सीएनजी गॅस पंप उघडण्यासाठी आवश्यक पात्रता

1- अर्जदार हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

2- ज्या व्यक्तीला स्वतःच्या नावाने सीएनजी पंप सुरू करायचा आहे त्याचे वय कमीत कमी 21 ते जास्तीत जास्त साठ वर्षाच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.

3- अर्जदार हा कमीत कमी दहावी पास असणे गरजेचे असून शैक्षणिक पात्रता पदवी म्हणून विहित करण्यात आलेली आहे.

4- उद्योग व्यवसायासाठी लागणारे कौशल्य आणि सुरक्षा नियमांचे ज्ञान ज्या व्यक्तींना आहे अशांना यासाठी प्राधान्य दिले जाते.

 सीएनजी पंप डीलरशिपकरिता आवश्यक अटी

1- सीएनजी पंप उघडण्याकरिता तुमच्याकडे 700 चौरस मीटरची जमीन किंवा एखादा भूखंड असणे गरजेचे आहे. तसेच या जमिनीची रुंदी 25 मीटर असावी.

2- सदर जमिनीच्या कोणत्याही प्रकारचा वाद नसावा.

3-तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या कोणत्याही सदस्याच्या जमिनीवर सीएनजी पंपासाठी अर्ज करू शकतात. परंतु याकरिता तुम्हाला संबंधित व्यक्तीकडून एनओसी किंवा शपथपत्र घेणे गरजेचे आहे.

4- समजा तुम्ही जर जमीन भाड्याने घेतले असेल तर त्या जमिनीचा करारनामा बंधनकारक आहे. तसेच नोंदणीकृत विक्री करार देखील असणे गरजेचे आहे.

5- तुमची जमीन जर कृषी खाली असेल तर तिचे अकृषिक मध्ये रूपांतर करणे गरजेचे आहे.

6- तसेच सदरील जमिनीचे नोंदणी आणि त्या जमिनीचे संपूर्ण कागदपत्रे व नकाशे असणे गरजेचे आहे.

7- तुमची जमीन किंवा प्लॉट हा मुख्य रस्त्याला जोडलेला असणे गरजेचे असून गॅस कंपनीची जी काही पाईपलाईन आहे तिच्यापासून दोन किमी त्रिज्येच्या आत संबंधित जमीन किंवा भूखंड असावा.

8- महत्वाचे म्हणजे या अंतर्गत लेटर ऑफ इंटेंत जारी करताना तुम्हाला रिफंडेबल प्रक्रिया म्हणून पाच लाख रुपये जमा करणे गरजेचे आहे.

 अशा पद्धतीने करावा ऑनलाईन अर्ज

याकरिता सीएनजी गॅस पंप डीलरशिप देणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे गरजेचे आहे. तुम्हाला डीलरशिप कंपनीच्या ज्या काही अधिकृत वेबसाईट आहेत त्यांना भेट देऊन सातत्याने तपासात राहावे लागेल. कारण अशा कंपन्या त्यांच्या वेबसाईटवर डीलरशिप साठी जाहिरात करत असतात. या माध्यमातून नागरिकांना स्वतःचा सीएनजी पंप सुरू करता येतो. जाहिरात निघाल्यानंतर तुम्हाला अर्ज करणे गरजेचे आहे. कंपनीने तुमचा अर्ज स्वीकारला तर तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात

 ऑफलाइन पद्धतीने…..

तुम्हाला जर ऑफलाईन पद्धतीने सीएनजी गॅस पंपाकरिता अर्ज करायचा असेल तर तुम्हाला त्याकरिता तुमच्या जवळच्या गॅस डीलरशिप असणाऱ्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करणे गरजेचे आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून तुम्ही सीएनजी पंपाकरिता ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करू शकतात.